Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा

Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा

Latest News Mogra Farming Success Story Jasmine Cultivation Transforms Gaidhhond into a 'Dream Village' | Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा

Mogra Farming Success Story : अख्ख गावं करतंय मोगरा शेती, रोज एक क्विंटलची काढणी, गावकऱ्यांचं स्थलांतर थांबलं! वाचा यशोगाथा

Mogra Farming Success Story : पारपांरिक शेतीला बाजूला सारून फुलशेतीला जवळ केल्याने इथल्या गावकऱ्यांचं नशीब पालटलं आहे.

Mogra Farming Success Story : पारपांरिक शेतीला बाजूला सारून फुलशेतीला जवळ केल्याने इथल्या गावकऱ्यांचं नशीब पालटलं आहे.

ना नीट रस्ता, ना वर्षभर पुरेल इतकं पाणी, ना कुणा लोकप्रतिनिधींची नजर, केवळ अन् केवळ गावकऱ्यांच्या एकजुटीनं गावाचं रुपडं पालटलं. इथं केवळ भात, नागली, वरई अशी पारंपारिक पिके घेतली जायची. जिथं होळींनंतर कुणी नाशिक तर कुणी गुजरातला रोजगारासाठी जात असतं. मात्र आजच्या घडीला या गावाने मोगरा शेतीतून नंदनवन फुलवलं आहे. गावाची साथ मिळाली तर काहीही अशक्य नाही, डोंगरदऱ्याचाही कायापालट करता येतो, हे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अतिदुर्गम भागात वसलेल्या गायधोंड गावाने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील गायधोंड (ता. पेठ) गाव हे अगदी गुजरात सीमेवर वसलेलं आहे. गावाजवळून जाणारी दमणगंगेची उपनदी, चहूबाजूंनी डोंगर दऱ्या. खरं तर आडगाव या ग्रुप ग्रामपंचायतच्या पाच पाड्यांपैकी गायधोंड हा एक ३५० लोकवस्तीचा पाडा. अगदी गावची नदी ओलांडली की गुजरात सीमा लागते.

म्हणजेच नाशिकपासून कोसो दूर अन् विकासापासूनही. शेती म्हणजे केवळ भात शेती. दुसरं काहीच नाही. बागायती शेतीचे नावच नाही. पावसाळ्यात दुधडी भरून वाहणारी नदी उन्हाळ्यात कोरडीठाक... म्हणजे शेतात राब राब राबायचं, काम करायचं, जेवढं उत्पन्न येईल तेवढ्यावर गुजराण करायची, असा इथल्या गावकऱ्यांचा दिनक्रम... 

मोगरा शेतीची सुरवात 
२०१७ ला गायधोंड येथे कृषी अधिकारी म्हणून लक्ष्मण खुरकुटे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या माध्यमातून १५ शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या माध्यमातूनच काही शेतकऱ्यांनी मोगरा शेतीला भेट दिली. खुरकुटे यांनी काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर मोगऱ्याची झाडे दिली. कालांतराने वर्षभराचा वेळ गेला, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटमधील झाडांची वाढ होऊ शकली नाही.

येथीलच राऊत यांचा प्लॉट चांगला बहरात आला होता. साधारण सात ते आठ महिन्यांनी पहिली काढणी केली. तेव्हा २ किलो मोगरा निघाला. त्याला ४०० रुपये दर मिळाला. दुसऱ्या दिवशी ४ किलो निघाला, त्याला ८०० रुपये किलो दर मिळाला. गावातील इतर शेतकऱ्यांना राऊत यांचं उत्पन्न पाहून आपल्या प्लॉटमधील झाडांचे व्यवस्थापन करण्यास सुरवात केली. हळूहळू पाच, दहा, पंधरा म्हणता म्हणता, ८० ते ९० टक्के शेतकरी शेती करू लागले आहेत. 

मोगरा मार्केटला कसा पोहचतो... 
गावातीलच कमलेश राऊत या शेतकऱ्याकडे सकाळपासूनच शेतकऱ्यांची रीघ लागते. प्रत्येकजण एक किलो, कुणी दोन किलो असा मोगरा घेऊन येतात. यामध्ये बेलपाडा, आडगाव, बिलकस, वडाचा माळ, विरक्षेत, गांगोडसह गुजरात मधील तीन चार गावांचा समावेश आहे. या ठिकाणी रीतसर वजन केले जाते. एका नोंदवहीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाची नोंद केली जाते. त्यानंतर दुपारी १२ ते एक वाजेपर्यंत सर्व मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचा मोगरा एकत्रित होतो. पुढे ५०-५० किलोच्या दोन बॅगा तयार केल्या जतात. अन् गावातीलच एखाद्या तरुणाला मजुरी देऊन तो मोगरा नाशिक मार्केटला पाठवला जातो. 

मोगरा अन् सोनचाफा शेतीचं गणित 

मोगरा रोपे साधारण १२ ते १४ रुपयांना खरेदी होते. भागानुसार किंमतीत चढ उतार बदलतो. लागवडीचा खर्च १० ते १२ हजार रुपये , यामध्ये रोपे, लागवडीसाठी खड्डे, फवारणी, ठिबक आदी. त्यानंतर सात ते आठ महिन्यांनी कळ्या येतात. त्यावेळी झाड हे एक ते दीड फुटापर्यंत वाढलेले असते. उत्पन्न येण्यास सुरवात होते. पुढे दहा बारा वर्षं मोगऱ्याचे उत्पन्न देते. 

सोनचाफ्याचे रोपे साधारण १२० ते १५० रुपयांना मिळतात. साधारण दहा फूट अंतरावर लागवड केली जाते. आठ ते दहा महिन्यांनी उत्पन्न मिळण्यास सुरवात होते. इथल्या चार पाच शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर सोनचाफा शेती सुरु केली आहे. रोज १५०० ते २ हजार नग माल जमा केला जातो. त्यांनतर ओल्या कापडात बांधून पुढे मोगऱ्यासोबत मार्केटला पाठवली जातात.

गावाचं नशीब बदललं!
पारपांरिक शेतीला बाजूला सारून फुलशेतीला जवळ केल्याने इथल्या गावकऱ्यांचं नशीब पालटलं आहे. शिवाय या शेतीमुळे स्थलांतर थांबले असून प्रत्येक कुटुंबाला रोजगार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे गायधोंड गावाला लागून गुजरात सीमा आहे. अगदी चार पाच किलोमीटरवर अंतरावर गुजरात राज्यातील गावे वसलेली आहे. इथली मोगरा शेती पाहून ते शेतकरी देखील मोगरा शेती करू लागले आहेत.

आजमितीस गावात जवळ्पास २२ हुन अधिक शेततळी आहेत, अनेक शेतकऱ्यांकडे सोलरची व्यवस्था आहे. तसेच प्रत्येक घर पिवळ्या रंगानी रंगवलं आहे, ते म्हणजे सोनचाफा शेतीच प्रतीक म्हणून.. विशेष बाब म्हणजे अलीकडेच गावाला ड्रीम विलेज म्हणून नवी ओळख मिळाली आहे.

 

महिलांसाठी सुवर्णसंधी, 15 लाखांचं कर्ज मिळतंय, 30 पैकी कोणताही एक व्यवसाय करा, इथे करा अर्ज

 

Web Title : मोगरा की खेती से गांव में समृद्धि: पलायन रुका, सफलता की कहानी

Web Summary : कभी संघर्षरत गायधोंड गांव, मोगरा की खेती से समृद्ध हुआ। ग्रामीणों ने एकजुट होकर फूलों की खेती अपनाई, पलायन को पलटा। प्रतिदिन एक क्विंटल मोगरा काटा जाता है, जिससे आय बढ़ रही है और समुदाय 'ड्रीम विलेज' बन गया है।

Web Title : Mogra Farming Transforms Village: Increased Income Halts Migration, a Success Story

Web Summary : Gaydhond village, once struggling, thrives with Mogra farming. Villagers united, adopted floriculture, reversing migration. Daily, a quintal of Mogra is harvested, boosting income and transforming the community, now a 'Dream Village'.