Lokmat Agro >लै भारी > Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Latest News Income of two lakhs in ninety days from mustard farming, read in detail | Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Mustard Farming : मोहरीच्या शेतीतून नव्वद दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Mustard Farming : १४ एकर शेतीपैकी पाच एकरात मोहरी पिकाची लागवड (Mohari Farming) करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

Mustard Farming : १४ एकर शेतीपैकी पाच एकरात मोहरी पिकाची लागवड (Mohari Farming) करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- दिलीप चौहान 
गोंदिया :
धानाच्या शेतीसाठी ओळख असलेल्या गोंदिया (Gondiya District) जिल्ह्यातील फनेंद्र हरिणखेडे या शेतकऱ्याने १४ एकर शेतीपैकी पाच एकरात मोहरी पिकाची लागवड करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. फक्त ९० दिवसांतच त्यांना दोन लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

गोंदिया जिल्हा हा तसा धानाचा जिल्हा (Paddy Farming) म्हणून ओळखला जातो. मात्र धान लावून शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांनी धान पिकाला बगल देत नवनवीन प्रयोग सुरू केले आहे. गोरेगाव शहरालगत असलेल्या ग्राम कटंगी येथील सेवानिवृत्त लेखाधिकारी प्रगतिशील शेतकरी फनेंद्र हरिणखेडे यांनी आपल्या शेतात मोहरी पिकाची लागवड केली असून तब्बल पाच एकरात हे पीक पेरले आहे. या पिकातून त्यांनी ९० दिवसांत दोन लाखांचा नफा मिळवून घेतला. 

विशेष म्हणजे त्यांच्या शेतात गेल्यावर नवनवीन प्रकारचे पीक व झाडे पाहायला मिळतात. या शेताची देखरेख करण्यासाठी त्यांनी आठ सीसीटीव्ही कॅमेरे शेतात बसविले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते २४ तास शेतात नजर फिरवत असतात. त्यांच्या शेतातील मोहरीचे पिवळे फूल आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. हरिणखेडे यांनी आपल्या १४ एकर जमिनीवर सागवान, लिंबू, चिकू, आंबा, फणस, आवळा व नारळची झाडे आधीच लावली आहेत. या झाडांना भविष्यात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून शेतातच एक मोठे शेततळे उभारले आहे.

एकीकडे सध्याच्या काळात शेती फारशी काही फायद्याची नाही. यासाठी नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांना करावे लागतात. पण त्यासाठी अनुभवाची गरज भासते. अशात लहानपणापासूनच शेतीची आवड असणारे तालुक्यतील ग्राम कटंगी येथील प्रगतिशील शेतकरी फनेंद्र हरिणखेडे यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरले आहेत. 

मोहगुणीची २०० झाडांची लागवड  
हरिणखेडे यांनी आपल्या शेतात मोहगुणीची २०० झाले लावली आहेत. जिल्ह्यात मोहगुणीचे झाड नाही. खरे तर या संदर्भात शेतकऱ्यांना माहितीच नाही. मोहगुणीच्या लाकडापासून जहाज तसेच बंदुकीचा कुंदासुद्धा बनविला जातो. बाजारात या झाडाची मोठी मागणी आहे.  
 

Web Title: Latest News Income of two lakhs in ninety days from mustard farming, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.