Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुजबेरीचे पिक पाच महिन्यात देतंय तब्बल ५ लाखांचे उत्पन्न; कशी केली जाते गुजबेरीची शेती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:43 IST

gooseberry farming अवघ्या आठ गुंठे क्षेत्रात केवळ पाच महिन्यांत तब्बल चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यामधून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.

दिलीप पाडळेपाचगणी: महाबळेश्वर तालुक्यातील धामुणसेवाडी (कासवंड) येथील प्रगतशील शेतकरी सचिन पडसरे यांनी अल्प क्षेत्रात गुजबेरी (ढमबुळकी) या नैसर्गिक फळाच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.

त्यांनी अवघ्या आठ गुंठे क्षेत्रात केवळ पाच महिन्यांत तब्बल चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. यामधून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.

महाबळेश्वर परिसरातील रानावनात नैसर्गिक आणि पित्तनाशक गुणधर्म असलेले फळ म्हणून पूर्वी गुजबेरी हे फळ ओळखले जात होते.

मात्र, वाढती बाजारपेठ आणि मागणी लक्षात घेऊन आता अनेक शेतकरी या फळाच्या व्यावसायिक शेतीकडे वळत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात लागवड केल्यानंतर डिसेंबर-जानेवारीपासून फळधारणा सुरू होते आणि साधारणतः चार ते पाच महिने सातत्याने उत्पादन मिळत राहते.

महाबळेश्वर तालुक्यातील धामुणसेवाडी (कासवंड) येथील सचिन पडसरे यांच्या अनुभवातून या शेतीचे गणित स्पष्ट होते. त्यांना आठ गुंठ्यांत दिवसाआड सरासरी ५० किलो उत्पादन मिळते.

महिन्याला साधारण ७५० ते ८०० किलो आणि पाच महिन्यांत सुमारे चार हजार किलो उत्पादन होते. या उत्पादनाला बाजारात चांगला दर मिळतो. त्यामुळे चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते.

विशेष म्हणजे या फळासाठी रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर अत्यल्प किंवा जवळपास नसतो. त्यामुळे खर्चही कमी राहतो.

अशी आहेत वैशिष्ट्ये...◼️ गुजबेरी फळ नैसर्गिक असून डोंगरकपारीत आढळणारे आहे.◼️ अलीकडे शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे.◼️ हे फळ कागदी आवरणाच्या आतमध्ये असते.◼️ हे दिसण्यास तांबूस राहते. थोडक्यात रानटी लहान टोमॅटोसारखं असते.◼️ सध्या जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शेतकरी गुजबेरीच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत.◼️ कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा पर्याय म्हणून या फळाकडे पाहिले जात आहे.

गुजबेरी हे पूर्णपणे नैसर्गिक फळ असून, याला बाजारात मोठी मागणी आहे. उत्पादन खर्च अत्यल्प असल्याने नफा अधिक मिळतो. मागील चार वर्षांपासून मी या शेतीकडे वळलो असून, याचा चांगला फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्तता मिळवणे सोपे जाते. - सचिन पडसरे, शेतकरी

अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक

English
हिंदी सारांश
Web Title : Gooseberry Farming: Farmer Earns ₹5 Lakhs in 5 Months

Web Summary : Farmer Sachin Padsare earns ₹4-5 lakhs in five months from gooseberry farming on just eight gunthas. Low input costs and high market demand contribute to significant profits, attracting more farmers to gooseberry cultivation.
टॅग्स :शेतीशेतकरीफळेफलोत्पादनमहाबळेश्वर गिरीस्थानपीक व्यवस्थापनबाजार