Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड माळरानावर विविध आंतरपिकातून फुलवली एकात्मिक शेतीची स्वप्ने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:20 IST

तिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे.

कांताराम भवारीआंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. ओळखला जातो. पावसाळ्यातील भातशेती खेरीज या भागात दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही.

मात्र, अशाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वीही त्यांनी शेतीमध्ये कांदा, गहू, हरभरा, वाटाणा, वांगे आदी पिके घेत बागायती शेतीचे प्रयोग यशस्वी केले आहेत.

आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यातील भातशेती खेरीज या भागात दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी पोखरी येथील शेतकरी सोमनाथ बेंढारी यांनी शासनाच्या मदतीने आपल्या शेतात शेततळे तयार करून घेतले.

पुढील पावसाळ्यात या शेततळ्यात पाणी साठले आणि या पाण्यातच त्यांना आपली बागायती शेतीची स्वप्ने दिसू लागली. या पाण्याचा वापर करून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी वांग्याचे पीक घेतले. त्यानंतर माळरानावर १५० आंब्याची झाडे लावून ती जगवण्याची किमया केली आहे.

शेततळ्यात मत्स्य व्यवसाय करण्याचेही यशस्वी प्रयत्न केले आहेत. गेल्यावर्षी त्यांनी कांद्याची लागवड करून ६० ते ७० पिशव्यांचे उत्पादन घेतले होते. त्याच्या जोडीला हरभरा, वाटाण्याचेही उत्पादन त्यांनी घेतले आहे. चालूवर्षी शेतातील भातपीक निघाल्यानंतर त्यांनी बटाट्याची लागवड केली होती.

गहू, हरभरा, वाटाणा पिकाविषयी वेळोवेळी कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली. कृषी सहायक ज्ञानेश्वर लोहकरे, कृषी विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले. घोडेगाव व नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये जाऊन त्यांनी पिकाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, याची माहिती घेतली.

अधिक वाचा: तुर्की बाजरीने केली कमाल ढेकळवाडीचे शेतकरी नानासाहेब झाले मालामाल

टॅग्स :शेतकरीबटाटापीकशेतीपीक व्यवस्थापनआंबेगावदुष्काळभात