lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > आटपाडीच्या बनपुरीतील दीपक देशमुख यांच्या डाळिंबाची रशियावारी; जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंब निर्यात

आटपाडीच्या बनपुरीतील दीपक देशमुख यांच्या डाळिंबाची रशियावारी; जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंब निर्यात

Deepak Deshmukh from Banpuri in Atpadi taluka Pomegranate export to Russia | आटपाडीच्या बनपुरीतील दीपक देशमुख यांच्या डाळिंबाची रशियावारी; जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंब निर्यात

आटपाडीच्या बनपुरीतील दीपक देशमुख यांच्या डाळिंबाची रशियावारी; जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंब निर्यात

बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षांपासून डाळिंब पीक घेतात. प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात. मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला रशियामध्ये सर्वाधिक मागणी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विकास देशमुख
नेलकरंजी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील प्रगतशील शेतकरी दीपक देशमुख यांचे भगवा डाळिंब अथक प्रयत्नानंतर रशियाला निर्यात झाले. जिल्ह्यातून प्रथमच रशियालाडाळिंब पाठवण्याचा मान देशमुख यांना मिळाला.

बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षांपासून डाळिंब पीक घेतात. प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात. मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला रशियामध्ये सर्वाधिक मागणी आहे.

दीपक देशमुख यांची बनपुरी येथे अडीच एकरात डाळिंब बाग आहे. एकरात त्यांची ८०० डाळिंबाची झाडे आहेत. प्रामाणिक कष्ट जिद्द आणि नावलौकिकाच्या जोरावर त्यांनी ११८ रुपये प्रतिकिलो दर मिळवला.

सध्या बाजारपेठेमध्ये डाळिंबाला साधारणपणे ५० ते ९० रुपये दर चालू आहे. त्यांच्या प्रति झाडास २० ते २५ किलो उत्पन्न निघेल, असा त्यांचा अंदाज आहे. याबाबत दीपक देशमुख म्हणाले, रशियाला शेतीमाल निर्यात करणारे व्यापाऱ्यांनी आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असणारे डाळिंब असून यासाठी महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी यांचे मार्गदर्शन मिळाले.

अगदी कमी खर्चात उच्चांकी दर्जाची आणि उच्चांकी दर मिळाल्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहे. यावेळी बागेस आटपाडी, जत, सांगोला येथील शेतकऱ्यांनी भेट देऊन बागेची पाहणी करीत आहेत.

रशियामध्ये निर्यातीसाठी अनेक कसोट्यांवर डाळिंबाच्या दर्जाची तपासणी केली जाते. त्यामुळे आतापर्यंत आपल्या भागातील डाळिंब रशियात जात नव्हते. मात्र यंदा येथील दर्जेदार डाळिंबांनी रशियाच्या बाजारपेठेतही स्थान मिळवले आहे.

जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंब निर्यात
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातून आजपर्यंत रशियाला डाळिंब गुणवत्तेअभावी पोहोचू शकले नव्हते. पण आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दीपक देशमुख या शेतकऱ्याने जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि गुणवत्ता याच्या जोरावर आपल्या डाळिंबाची रशिया देशात मागणी करण्यास भाग पाडले.

रशिया एक्स्पोर्टमुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन
दीपक देशमुख यांच्या डाळिंब बागेच्या यशस्वीपणामुळे इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे डाळिंबाचे कमी झालेले क्षेत्र पुन्हा एकदा उभारी घेण्याच्या स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने डाळिंब क्षेत्रा तयार होत आहे. रशिया व युरोपमध्ये एक्स्पोर्ट वाढून तालुक्याला परकीय चलन मिळण्याची संधी प्राप्त होत आहे, यात तिळमात्र शंका नाही.

अधिक वाचा: काय सांगताय.. ऊसात वांग्याचे आंतरपिक; १८ गुंठ्यात तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न

Web Title: Deepak Deshmukh from Banpuri in Atpadi taluka Pomegranate export to Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.