Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

Chandan Startup: An experiment by a farmer from Vidarbha! A startup was established by cultivating sandalwood on 3.5 acres | Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

'काहीतरी वेगळे करायचे' या विचारातून संजय गंडाटे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत चंदनाच्या ७४० झाडांची लागवड केली.

'काहीतरी वेगळे करायचे' या विचारातून संजय गंडाटे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत चंदनाच्या ७४० झाडांची लागवड केली.

- जितेंद्र ढवळे 

नागपूर : शेती म्हणजे केवळ पिके आणि उत्पादन नव्हे, तर नवकल्पनांची प्रयोगशाळा ठरू शकते, हे गडचिरोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पारडी (कुपी) येथील शेतकरी संजय गंडाटे यांनी अवघ्या ३.५ एकर शेतीतून चंदनावर आधारित स्टार्टअप उभे केले असून, त्यांच्या या उपक्रमाचे दर्शन नागपूर येथे सुरू असलेल्या अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६- खासदार औद्योगिक महोत्सवात घडत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या स्टॉलवर विक्रीस ठेवलेले चंदनाचे ऑरगॅनिक साबण नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

'काहीतरी वेगळे करायचे' या विचारातून संजय गंडाटे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत चंदनाच्या ७४० झाडांची लागवड केली. यामध्ये २०० रक्तचंदनाच्या झाडांचा सामावेश असून, ही झाडे सध्या चार वर्षांची झाली आहेत. दीर्घकालीन उत्पन्न देणाऱ्या चंदन लागवडीसोबतच त्यावर आधारित मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याचा त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतला.

भांडवलाची मोठी गुंतवणूक किंवा महागडे प्रशिक्षण न घेता, डिजिटल माध्यमांचा अभ्यास करून गंडाटे यांनी साबणनिर्मितीचे तंत्र आत्मसात केले. चंदनाची पाने, चंदन पावडर, काळी व पिवळी हळद यांसारख्या नैसर्गिक व औषधी घटकांपासून त्यांनी त्वचेस पोषक, रसायनमुक्त साबण तयार केले.

स्थानिक संसाधनांचा वापर, कमी खर्च आणि उच्च गुणवत्ता हे त्यांच्या टार्टअपचे वैशिष्ट्य ठरत आहे. अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६ मध्ये या साबणांना ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, उद्योजक, शैक्षणिक तज्ज्ञ आणि शेतकरी वर्गानेही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरीही नावीन्यपूर्ण विचार, तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर उद्योजक बनू शकतो, याचा ठोस संदेश गंडाटे यांच्या चंदन स्टार्टअपमधून मिळतों. शेती, स्टार्टअप आणि आत्मनिर्भरतेचा सुवास पसरवत संजय गंडाटे यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशकथा नसून, विदर्भातील तरुण व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहे.

Web Title : विदर्भ के किसान का चंदन स्टार्टअप: 3.5 एकड़ पर नवाचार की खेती

Web Summary : गढ़चिरौली के किसान संजय गंडाटे ने 3.5 एकड़ में चंदन आधारित स्टार्टअप स्थापित किया। उन्होंने लाल चंदन सहित 740 चंदन के पेड़ उगाए और प्राकृतिक तत्वों का उपयोग करके जैविक साबुन का उत्पादन करते हैं। एडवांटेज विदर्भ-2026 में प्रदर्शित उनकी नवीन पहल ग्रामीण उद्यमिता और आत्मनिर्भरता को प्रेरित करती है।

Web Title : Vidarbha Farmer's Sandalwood Startup: Cultivating Innovation on 3.5 Acres

Web Summary : Gadchiroli farmer Sanjay Gandate established a sandalwood-based startup on 3.5 acres. He cultivated 740 sandalwood trees, including red sandalwood, and produces organic soaps using natural ingredients. His innovative approach, showcased at Advantage Vidarbha-2026, inspires rural entrepreneurship and self-reliance.