Join us

सेवानिवृत्तीनंतर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पोलीस मामांची आधुनिक फळ शेतीतून आर्थिक उन्नती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:35 IST

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे.

दहिवडी : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे.

त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मायभूमीत राहणे पसंत करत ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली आहे. यातून वर्षाच्या आतच उत्पन्न मिळविण्यास सुरुवात झाली आहे.

सेवानिवृत्त अधिकारी धनंजय जगदाळे यांनी मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी २० गुंठे क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटची एक हजार रोपे लावली. दहा बाय दहा फुटाचे अंतर ठेवून ही लागवड केली.

यासाठी २५० सिमेंट पोल वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एक वर्षाच्या आतच त्यांना ५० कॅरेट फळांचा माल मिळाला आहे. तो आटपाडी, सातारा, फलटण या ठिकाणी पाठवण्यात आला.

त्यातून आतापर्यंत ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातच दरवर्षी किमान याचे चार तोडे होणार आहेत. सध्या या फळाला चांगली मागणी आहे.

मात्र, कोरडवाहू बिदाल गाव डाळिंब आणि कांदा या पिकासाठी प्रसिद्ध आहे. क्षेत्रामध्ये आणखीन हे तिसरे फळ जोमाने वाढत आहे. धनंजय जगदाळे यांचा आदर्श घेऊन अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे.

शेतमालाच्या दराचा विचार करता शेतकऱ्याने आता पारंपरिक शेती न करता वेगळ्या उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. मीही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असतो. प्रकृती साथ देत नसतानाही या ड्रॅगन फ्रूट बागेमुळे मला एक वेगळाच आनंद मिळाला आहे. - धनंजय जगदाळे, बिदाल

अधिक वाचा: लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट; शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर लावले पत्नीचे नाव

टॅग्स :शेतीशेतकरीफलोत्पादनपीकडाळिंबफळेपोलिसकांदा