कडधान्याला किड लागण्याची कारणे साठवणूकीत कडधान्याचे नुकसान करणाऱ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव शेतात पीक परिपक्व झाल्यापासूनच दिसून येतो.
ही कीड पक्व झालेल्या शेंगा अथवा दाण्यावर आपली अंडी घालते व अळी प्रादुर्भावग्रस्त पिकाची मळणी केल्यास ही कीड साठवणुकीत येऊन कडधान्याचे नुकसान करते.
धान्य साठवणुकीतील जागेत असलेल्या भेगा फटीमध्ये वास्तव्य करणारे भुंगेरे नवीन धान्याला क्षतीग्रस्त करतात. जुनी पोती व साठवणुकीच्या साधनांमार्फतसुध्दा या किडींचा प्रसार होतो.
पोत्याच्या किंवा जुन्या साठवणूकीच्या कोपऱ्यात हे किडे वास्तव्य करतात. वाहतूकीची साधणे जसे बैलगाडी, ट्रेलर किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीपासूनही या किडींचा प्रसार होतो.
साठवणुकीचा विचार केल्यास कडधान्याला इतर धान्याच्या तुलनेत किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो. मूग, उडीद, तूर, वाटाणा, रंगाचे २ ठिपके असतात.
या भुंगेऱ्याची मादी कडधान्यावर एक एक करून जवळजवळ ९० अंडी देते. अंडी अवस्था ४ ते ५ दिवस असते. चवळी तसेच हरभरा या कडधान्यात कॅलासोब्रुकस भुंगेरा अतोनात नुकसान करतो.
पूर्ण वाढलेला भुंगेरा गडद चॉकलेटी रंगाचा ६ ते ७ मिमी लांब असतो. फुगीर लांबट गोल भुंगेऱ्याच्या पाठीवर राखाडी या किडीची अळी गुबगुबीत पांढऱ्या रंगाची सुरकुत्या असलेली असते.
अळी धान्यात शिरून उपजिवीका करते. अळी अवस्था १५ ते २० दिवसात पूर्ण होते. कोषावस्था ४ ते ८ दिवसात दाण्याच्या आत पूर्ण होते. पूर्ण वाढलेला भुंगेरा दाण्यास छिद्र पाडून बाहेर येतो.
प्रौढ भुंगेरा साधारणतः १० दिवस जगतो. प्रौढ भुंगेऱ्याला पंख असल्यामुळे कोठारापासून उडून शेतात जातो व कापणीआधी किंवा कापणीनंतर धान्यावर किंवा शेंगावर अंडी घालतो.
कडधान्य शेतात असताना घ्यावयाची काळजी
◼️ कापणीनंतर धान्य खळ्यात किंवा शेतात असल्यास त्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्क्यांच्यावर असते. या कालावधीत तापमान जवळपास ३० अं. सेल्सिअस तर हवेतील आर्द्रता ७५ टक्क्याच्या वर असते.
◼️ या बाबी कीड व रोगाच्या वाढीला अतिशय अनुकूल असल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढतो. बुरशीची वाढ झाल्यामुळे तूर हे कडधान्य टणक होते व लवकर शिजत नाही.
◼️ तूरीच्या पेंड्यांना बुरशीपासून वाचविण्यासाठी त्या शेतात किंवा खळ्यात उभ्या करून ठेवाव्या. पेंड्या बांधतांना थोड्या सैल बांधल्यास हवा खेळती राहून धान्य लवकर वाळण्यास मदत होते व बुरशीचा प्रादुर्भावही टाळता येतो.
◼️ ज्या कडधान्याच्या पेंड्या बांधणे शक्य होत नाही. उदा. उडीद, मूग, चवळी त्यांना टणक कोरड्या उंचवट्याच्या जागेवर साठवून नियमितपणे त्यांची उलटणी करत रहावी.
◼️ खरीप मूग व उडीद कापणीच्या वेळेस ओलसर वातावरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ते टाळण्यासाठी शेतात गरजेनुसार ५४५ मी ते १०x१५ मी. आकाराचे ओटे तयार करून तात्पुरत्या तंबू किंवा प्लास्टिक आच्छादनाची व्यवस्था करणे महत्वाचे ठरते.
अधिक वाचा: दुधनीत तुरीच्या दराने नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला; वाचा कमाल काय मिळाला दर?
