Lokmat Agro >स्मार्ट शेती > आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर

आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Who has the right to inherit the property after the mother's death? What are the rules? Read in detail | आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर

आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर

कुटुंबातील सदस्य म्हणून महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा त्यांना ती वारसा हक्कानेच अनेकदा प्राप्त होते. पतीच्या पश्चात महिलेच्या नावे असलेली संपत्ती तिच्या पश्चात कोणाला जावी याबाबत अद्यापही अनेक संभ्रम आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कुटुंबातील सदस्य म्हणून महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा त्यांना ती वारसा हक्कानेच अनेकदा प्राप्त होते. पतीच्या पश्चात महिलेच्या नावे असलेली संपत्ती तिच्या पश्चात कोणाला जावी याबाबत अद्यापही अनेक संभ्रम आहेत.

कायद्याच्या दृष्टीने विचार करण्यापेक्षा आईची संपत्ती ही कुटुंबातील सदस्यांची भावनिक बाब होते. संपत्तीचे वाटप हा कौटुंबिक प्रश्न नसून कायद्याच्या मर्यादेत येणारे गंभीर विषय आहेत.

प्रचलित हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार स्त्रीच्या नावे असलेली जमीन तिच्या मृत्यूनंतर तिच्या कायदेशीर वारसांमध्ये समान वाटली जाते. स्त्रीच्या संपत्तीवर तिच्या पश्चात तिच्या सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क दिला जातो.

मृत्युपत्र केले असेल तर त्यानुसार मालमत्ता वाटप होते. मृत्युपत्र केले नसेल तर कायदेशीर वारसांना समान हक्क दिला जातो. यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही.

कायदेशीर पद्धतीने केले गेलेले संपत्तीचे वाटपच वैध मानले जाते. अन्यथा त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. 'महिलेच्या मृत्यूनंतर पती, मुलगा, मुलगी यांना हक्क दिला जातो. वारस उपलब्ध नसतील तर तिचे आई-वडील भाऊ-बहीण यांना ही मालमत्ता दिली जाते.

कायद्यानुसार वचन, बोलणे किंवा फक्त कुटुंबातील तडजोड या कारणांनी मालमत्तेमधील वाटप कमी-अधिक करता येत नाही. कायद्याने हे वाटप समसमानच करावे लागते.

यात विवाहित मुलींनाही समान अधिकार देण्याचे सूचित केले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर सर्व वारसांनी कायदेशीर कागदपत्र तयार करून वाटप करणे गरजेचे असते. गरज असल्यास स्थानिक वकील किंवा महसूल अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा.

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Who has the right to inherit the property after the mother's death? What are the rules? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.