सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण असले म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते.
जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण किती असावे? सेंद्रिय पदार्थांचे उपलब्ध प्रमाण समजण्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते.
माती परीक्षणातील अहवालानंतर आपणास सेंद्रिय कर्ब असे व्यवस्थापन करणे सोयीचे होते. जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्बाचे सरासरी प्रमाण ०.४० ते ०.६० टक्के असणे आवश्यक असते.
तसेच १ टक्क्यांपर्यंत जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल तर ती जमीन चांगली समजली जाते. याशिवाय एक टक्क्यापेक्षा जास्त जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आढळले तर ती जमीन आदर्श जमीन समजली जाते.
सद्यस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे, म्हणजेच ०.२० ते ०.५० इतके आहे. याचा अर्थ जमिनीचा कस कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेमध्ये बदल झाल्याचे आपणास दिसून येते.
थोडक्यात जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादकताही कमी झालेली आहे. यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे खूपच गरजेचे आहे.
सुनील यादव
कृषी अधिकारी
जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा
अधिक वाचा: राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी
