वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने खरीप हंगामासाठी विकसित केलेले लोकप्रिय पाच वाण कोणते? कालावधी (दिवस), प्रति एकर बियाणे, सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) तसेच प्रमुख वैशिष्ट्यांसह सविस्तर माहिती पाहूया.
१) एमएयूएस-७२५ (MAUS-725)
कालावधी (दिवस) : ९०-९५
प्रति एकर बियाणे : २६
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) : १०-१२.६
प्रमुख वैशिष्ट्ये : निमपसऱ्या व चिरके पाने असणारा वाण, शेंगाचे प्रमाण अधिक व २०-२५ टक्के चार दाण्याच्या शेंगा, कीड व रोगास मध्यम प्रतिकारक, कोरडवाहूसाठी अधिक उत्पादन देणारा वाण.
२) एमएयूएस-७१ (MAUS-71)
कालावधी (दिवस) : ९३-९६
प्रति एकर बियाणे : २६
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) : ११.२-१२.०
प्रमुख वैशिष्ट्ये : फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. आंतरपीकास योग्य.
३) एमएयूएस-१५८ (MAUAS-158)
कालावधी (दिवस) : ९५-९८
प्रति एकर बियाणे : २६
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) : १०.५-१२.५
प्रमुख वैशिष्ट्ये : फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. आंतरपीकास योग्य, खोडमाशीसाठी सहनशील.
४) एमएयूएस-६१२ (MAUAS-612)
कालावधी (दिवस) : ९५-१००
प्रति एकर बियाणे : २६
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) : १३.०-१४.५
प्रमुख वैशिष्ट्ये : अधिक उत्पादन क्षमता, चक्रीभुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरीया पानावरील ठिपके व शेंगा करपा या रोगांना सहनशील.
५) एमएयूएस-१६२ (MAUAS-162)
कालावधी (दिवस) : १००-१०३
प्रति एकर बियाणे : २६
सरासरी उत्पादन (क्विंटल प्रती एकर) : ११.२-१२.०
प्रमुख वैशिष्ट्ये : यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त तसेच शारीरीक पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाहीत.
अधिक वाचा: राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर