Lokmat Agro >स्मार्ट शेती > औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

Use these eight enhancers cultures to reduce the cost of medicines and fertilizers; Read in detail | औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रीय व जैविक निविष्ठांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया करून अन्नद्रव्य, कीडींचे व रोगांचे व्यवस्थापन करता येईल.

सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रीय व जैविक निविष्ठांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया करून अन्नद्रव्य, कीडींचे व रोगांचे व्यवस्थापन करता येईल.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये वापरायच्या निविष्ठांचा दर्जा गुणावत्ता व उपलब्धता याबाबी सेंद्रीय शेती पध्दतीचा विकासास मारक ठरत असल्याचे आढळून येते.

सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये प्रामुख्याने सेंद्रीय व जैविक निविष्ठांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया करून अन्नद्रव्य, कीडींचे व रोगांचे व्यवस्थापन करता येईल.

बिजप्रक्रिया व संवर्धकांचा वापर
१) रायझोबियम कल्चर 
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : २५ ग्रॅम/२५ मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : डाळवर्गीय पिकांसाठी बिजप्रक्रियेद्वारे नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी.

२) अॅझोटोबॅक्टर कल्चर
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : २५ ग्रॅम/२५ मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : तृणधान्यवर्गीय व इतर पिकांसाठी बिजप्रक्रियेद्वारे नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी.

३) अॅझोस्पिरीलम
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : २५ ग्रॅम/२५ मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : तृणधान्यवर्गीय व इतर पिकांसाठी बिजप्रक्रियेद्वारे नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी.

४) अॅसिटोबॅक्टर
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : ५०० गॅम/५० लीटर पाण्यात.
उपयोग : ऊस पिकासाठी बेणे प्रक्रियेद्वारे नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी.

५) रायझोबियम कल्चर
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : २५ ग्रॅम/२५ मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : सर्व प्रकारच्या पिकांसाठी स्फुरदची उपलब्धता वाढविण्यासाठी.

६) सुडोमोनास
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : १० ग्रॅम किंवा १० मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : सर्व प्रकारच्या पिकांसाठी बुरशीजन्य प्रकारच्या रोगांपासून पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत संरक्षण करण्यासाठी.

७) ट्रायकोडर्मा
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : ५ ते १० ग्रॅम किंवा ५ ते १० मिली प्रति किलो बियाणे.
उपयोग : सर्व प्रकारच्या पिकांसाठी सुरुवातीच्या अवस्थेत बिजप्रक्रियेद्वारे बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी.

८) जिवाणुसंघ
बियाण्याला लावण्याचे प्रमाण : १० मिली/किलो बियाणे.
उपयोग : नत्र, स्फुरद व पालाशची उपलब्धता.

अधिक वाचा: कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Use these eight enhancers cultures to reduce the cost of medicines and fertilizers; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.