lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी

Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी

To increase the number of microorganisms in the soil; Prepare this easy slurry | Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी

Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी

मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या जमीनीमध्ये वाढवली पाहिजे.

मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या जमीनीमध्ये वाढवली पाहिजे.

शेअर :

Join us
Join usNext

मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या जमीनीमध्ये वाढवली तर जास्तीत जास्त अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतील व पिकांचे संपूर्ण पोषण होईल.

जिवाणू स्लरीच्या साह्याने आपण उपयुक्त सूक्ष्म जीवांची संख्या जमीनीत वाढवता येते व पिकांची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवता येते.

साहित्य
२०० लिटरचा ड्रम, अॅझोटोबॅक्टर, २५० ग्रॅम, पी.एस.बी. २५० ग्रॅम, केएमबी २५० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू २५० ग्रॅम, ट्रायकोडर्मा २५० ग्रॅम, मायकोरायझा ५० ग्रॅम, इ.एम. २ द्रावण १० लिटर, ताक २ लिटर, गुळ २ किलो, पाणी, शेण १० किलो किंवा अंड्यावरील कोंबडी खत ४० किलो, २ किलो कडधान्य पीठ, गोमुत्र ५ लिटर, कोरफड लगदा २ किलो, साडी किंवा धोतर इत्यादी.

कृती
- प्रथमतः २०० लिटर चा ड्रम स्वच्छ करावा त्यामध्ये १८० लिटर पाणी टाकावे त्यात ५ लिटर गोमूत्र टाकावे.
- जुनी साडी किंवा धोतरामध्ये २० किलो शेण किंवा अंड्यावरील कोबंडी खत ४० किलो. (पोल्ट्री स्लरीसाठी), २ किलो कडधान्य पीठ, व २ किलो कोरफड, २ किलो गुळ एकत्र मिसळून घ्यावा व त्याचे गाठोडे बांधावे.
- हे गाठोडे एका काठीला बांधून ड्रम मधील पाण्यात बुडेल अशा पद्धतीने बांधावे. हे गाठोडे बांधलेली काठी सकाळी व संध्याकाळी २ ते ३ वेळा हलवावी.
- चार दिवसात या गाठोड्यातील अर्क पाण्यात उतरतो. यामुळे स्लरी पुन्हा गाळावी लागत नाही.
- या नंतर या द्रावणात अॅझोटोबॅक्टर २५० ग्रॅम + पीएसबी २५० ग्रॅम + केएमबी २५० ग्रॅम उपलब्ध करून देणारे जीवाणू २५० ग्रॅम + ट्रायकोडरमा २५० ग्रॅम टाकावे.
- हे द्रावण दिवसातून ३ ते ४ वेळा काठीने ढवळावे किंवा ब्रुईंग करावे.
- ३ दिवसात हे द्रावण वापरण्यायोग्य होते.
- यामध्ये वापरण्यापूर्वी इ एम २ द्रावण १० लिटर व मायकोरायझा ५० ग्रॅम टाकून लगेच पूर्ण द्रावण एकरी वापरावे हे द्रावण सावलीमध्ये तयार करावे व गोणपाट किंवा झाकणाने झाकून ठेवावे.
विरजण म्हणून हे द्रावण वापरू नये.

जिवाणू स्लरीचे फायदे
१) जमीनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.
२) माती भुसभुसीत होते.
३) पिकांच्या पांढऱ्या मुळांचे प्रमाण वाढते.
४) अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
५) पिकांमधील आंतरीक रोगप्रतिकार शक्ती वाढते.

जीवाणू स्लरी कोणत्या पिकांसाठी केव्हा व किती वापरावी?
-
जीवाणू स्लरी ऊस, कापूस, सोयाबीन, द्राक्ष, केळी, डाळींब, फळभाज्या या पिकांमध्ये सर्व वाढीच्या आवस्थांमध्ये वापरता येते.
- पिक वाढीच्या प्रत्येक आवस्थेत, पिकाची वाढीची आवस्था, फुले येण्याची आवस्था, फळ निर्मितीची आवस्था फळ पक्वतेच्या आवस्थेत वापरावी.

प्रमाण
प्रत्येक वाढीच्या आवस्थेत एकरी २०० लिटर जिवाणूस्लरी पाटपाणी किंवा ठिबक द्वारे पाण्यातून सोडावी, जिवाणू स्लरीचे द्रावण विरजन म्हणून वापरू नये.

अधिक वाचा: Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?

Web Title: To increase the number of microorganisms in the soil; Prepare this easy slurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.