Join us

कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:14 IST

कांदा साठवणुकीत अधिक काळ टिकण्यासाठी व वजनात घट येऊ नये यासाठी कांदा काढणी, काटणी कशी करावी ह्याविषयी महत्वाच्या बाबी पाहूया.

कांदा साठवणुकीत अधिक काळ टिकण्यासाठी व वजनात घट येऊ नये यासाठी कांदाकाढणी, काटणी कशी करावी ह्याविषयी महत्वाच्या बाबी पाहूया.

 

  • कांदा लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाला की नवीन पात येण्याचे थांबते.
  • कांदा काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी तोडावे व ५० टक्के माना पडल्या नंतर कांदा काढणीस सुरूवात करावी.
  • पातीचा रंग पिवळसर दिसू लागतो. रांगडा कांदा साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काढणीसाठी तयार होतो.
  • याच वेळेस कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होवून आपोआप वाळतो व पात कोलमडते. यालाच आपण मान पाडणे असे म्हणतो.
  • कांदा पात सुकेपर्यंत शेतात वाळविल्यानंतर प्रथम कांद्याच्या मानेला पीळ देवून ३ ते ५ से.मी. (एक ते दीड इंच) मान ठेवूनच कांद्याची पात कापावी.
  • हा महत्वाचा टप्पा असून त्यामुळे पुढील काळात कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहुन सूक्ष्म जीवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणे, कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होवून वजनात घट होणे, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणे यासारख्या साठवणूकीतील नुकसानींना आळा बसतो.
  • कांद्याला अजिबात मान न ठेवता, कांद्याचे तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीत टिकत नाहीत व मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते.

अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर 

टॅग्स :कांदाकाढणीपीकपीक व्यवस्थापनरब्बीरब्बी हंगामशेतीशेतकरी