Lokmat Agro >स्मार्ट शेती > नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ?

नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ?

This 100% state-sponsored scheme for natural farming is beneficial for farmers; How will you benefit? | नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ?

नैसर्गिक शेती करण्यासाठी १००% राज्य पुरस्कृत 'ही' योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; कसा घ्याल लाभ?

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैव निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.

शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैव निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकरी बांधावरच निर्माण करतील यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन (१००% राज्य पुरस्कृत योजना) सुरु करण्यात आली आहे.

योजनेचा उद्देश
◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवणे.
◼️ जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवुन जमिनीची सुपिकता व आरोग्य सुधारणे.
◼️ रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे.
◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्य साखळी विकसित करणे.
◼️ नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे.
◼️ शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैव निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.

योजनेची व्याप्ती
राज्यातील सर्व ३४ जिल्हे

योजनेचे स्वरूप/बाबी/घटक/अनुदान मर्यादा
◼️ गट आधारित, ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट, १० गटांची एक शेतकरी उत्पादक कंपनी.
◼️ एकदा निवड केलेल्या लाभार्थी/गटास ३ वर्षे लाभ.
◼️ प्रति शेतकरी २ हेक्टरच्या मर्यादेत लाभ.
◼️ सेंद्रिय शेतीवर आधारित प्रशिक्षण, शेतात सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करणे, सेंद्रिय प्रमाणिकरण करणे, सेंद्रिय मालाची मूल्यवृद्धी करून विक्री व्यवस्था करणे.
◼️ रु. १३,२००/- प्रति हेक्टर म्हणजेच रु. ६.६० लाख प्रति गट तीन वर्षात अर्थसहाय्य.

लाभार्थी पात्रतेचे निकष
◼️ योजनेत एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देय राहील.
◼️ रासायनिक खते, किटकनाशके व तणनाशके तसेच बी.टी. बियाणे वापरता येणार नाहीत.
◼️ सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आवश्यक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास स्वेच्छेने तयार असलेल्या शेतकऱ्यांची निवड करावी.
◼️ सेंद्रिय शेतीबद्दल जागृत असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत प्राथम्याने सहभाग करावा.
◼️ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील त्या त्या जिल्ह्यातील प्रवर्गांच्या शेतकऱ्यांच्या प्रमाणात किमान शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड करावी.
◼️ महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देवून किमान ३० टक्क्यांपर्यंत महिलांचा योजनेत सहभाग राहील असे पहावे.
◼️ समुह स्तरावर स्थापन होणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये शेतकऱ्यांना भागधारक होणे बंधनकारक आहे.

कार्यान्वयीन यंत्रणा
राज्यस्तरावर कृषी संचालक (आत्मा), जिल्हास्तरावर-प्रकल्पसंचालक, आत्मा (सर्व)

अधिक माहितीसाठी
कृषी विभाग सहायक कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आत्मा (बीटीएम) यांचेकडे संपर्क साधावा.

अधिक वाचा: सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: This 100% state-sponsored scheme for natural farming is beneficial for farmers; How will you benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.