महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे.
१) गणेश- डाळिंबाचे अनेक वाण असले तरी स्व. डॉ. चिमा यांच्या प्रयत्नाने फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसित झालेली गणेश हा वाण सर्वोत्तम आहे.- या वाणाची फळे आकाराने मध्यम असून बिया मऊ असतात.- दाण्याचा रंग फिकट गुलाबी असून चव गोड असते.
२) जी. १३७- हा वाण गणेश जातीतुन निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेला आहे.- या फळाचे दाणे मऊ आहेत व रंग गणेश जाती पेक्षा किंचित गडद आहे.- दाण्याचा आकार व गोडी गणेश पेक्षा सरस आहे.
३) मृदला- हा वाण गणेश व गुल ए शाह रेड या वाणांच्या संकरित पिढीपासून निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केला आहे.- या वाणाची फळे आकाराने मध्यम ३०० ते ३५० ग्रॅम वजनाची असून फळांचा रंग व दाण्याचा रंग गडद लाल असतो.- बी अतिशय मऊ असून दाण्यांचा आकार मोठा आहे.- फळांची गोडी गणेश जातीच्या फळांसारखीच आहे.- फळांचा पृष्ठभाग गडद लाल व चमकदार असतो.
४) फुले आरक्ता- हा वाण गणेश व गुल ए शाह रेड या वाणाच्या संकरित पिढीपासून निवड पध्दतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केली आहे.- फळांचा मोठा आकार, गोड टपोरे, मऊ आणि आकर्षक दाणे.- फळांची साल चमकदार आणि गडद लाल रंगाची आहे.
५) भगवा- हा वाण अधिक उत्पादनक्षम असून फळांमध्ये गुणवत्तेचे अपेक्षित घटक असल्याचे आढळुन आले आहे.- या वाणाची फळे १८० ते १९० दिवसांमध्ये परिपक्व होतात.- फळांचा आकार मोठा, गोड टपोरे आणि आकर्षक दाणे, तसेच चमकदार.- आकर्षक रंगाची जाड साल असलेली फळे दूरवरच्या बाजारपेठांसाठी उपयुक्त आहेत.- इतर वाणांच्या तुलनेत हा वाण फळांवरील काळ्या ठिपक्या रोगांसाठी तसेच फुलकिडीस कमी बळी पडणारा आहे.- या सर्व बाबीमुळे भगवा वाणाची महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये लागवडीस शिफारस करण्यात आली आहे.
६) फुले भगवा सुपर- हा वाण भगवा वाणांमधील निवड पध्दतीने विकसित केला असून तो अधिक उत्पादनक्षम व गुणवत्तेचे दर्शक आहे.- या वाणाची फळे १७६ ते १८० दिवसात परिपक्व होतात.- फळांचा रंग गर्द केशरी, आकार मध्यम, सरासरी वजन २७१ ते २९९ ग्रॅम.- चव गोड व मऊ दाणे असून रसाचे प्रमाण जास्त आहे.
अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय