सोयाबीन, मका व कापूस या पिकात हुमणी किडीचे प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. तरी या किडीच्या व्यवस्थापना करिता सामूहिकरीत्या शेतकरी बंधूनी उपाययोजना कराव्यात.
हुमणी किडीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
हुमणी किड ही बहुभक्षी कीड असून या किडीमुळे झाडांची पाने पिवळे पडून झाटे सुकतात, अशी झाडे आढळल्यास झाड उपटून मुळे कुर्तडलेली आहेत का ते पहावे तसेच मुळे कुर्तडलेल्या झाडाखाली दोन ते तीन इंच खोल मातीत हुमणी किडीच्या अळ्या आहेत का ते शोधावे.
कसा कराल बंदोबस्त?
- पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी, आंतरमशागत करताना शेतातील अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
- शक्य असेल तिथे मोकाट पद्धतीने पाणी दिल्यास अळ्या गुदमरून मरतात व जमिनीच्या वर येतात. शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
- मेटारायझीम अनिसोप्ली या जैविक बुरशीची ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोझल काढून प्रादुर्भावग्रस्त पिकांच्या मुळाशी आळवणी करावी.
- उभ्या पिकात एका सरळ रेषेमध्ये झाडांची मर होत असल्यास आणि अशा झाडांची मुळे हुमणी फिडीने खाल्लेले असल्यास अशा ठिकाणी क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोझल काढून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी (याचे लेबल क्लेम नाही)
- (फीप्रोनील ४०% इमिडाक्लोरोप्रीड ४०%) हे मिश्र कीटकनाशक ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी (लेबल क्लेम नाही)
महत्वाचे: अळ्या जास्त प्रमाणात दिसल्यास व लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा.
अधिक वाचा: मॅग्नेट प्रकल्प आता २०३१ पर्यंत, २१०० कोटी निधीचा शासन निर्णय आला; कसा होणार फायदा?