lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

Protection of bananas from wind, storm, hail; New technology has arrived | वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

केळी पिकात नेट हाऊस तंत्रज्ञान वापरले तर केळीचे साधे पान सुद्धा फाटत नाही. संपूर्ण बाग सुरक्षित राहते. असे नुकसान मागील काळात बऱ्याचदा होताना पहिले आहे. मग केळीच्या शेतीला शाश्वत करायचे असेल तर काय हा प्रश्न उभा ठाकला आणि त्यातूनच प्रोटेक्टेड पद्धतीने केळी लागवडीचा पर्याय पुढे आला.

केळी पिकात नेट हाऊस तंत्रज्ञान वापरले तर केळीचे साधे पान सुद्धा फाटत नाही. संपूर्ण बाग सुरक्षित राहते. असे नुकसान मागील काळात बऱ्याचदा होताना पहिले आहे. मग केळीच्या शेतीला शाश्वत करायचे असेल तर काय हा प्रश्न उभा ठाकला आणि त्यातूनच प्रोटेक्टेड पद्धतीने केळी लागवडीचा पर्याय पुढे आला.

शेअर :

Join us
Join usNext

अनेक दशकांपासून केळी पिकावर वातावरण बदलाचा परिणाम होतांना आपण बघत आहोत. कधी गारपीट, तर केव्हा वारा वादळ तर या वर्षी मोठ्या प्रमाणात पुर तर मागील वर्षी अतिशय थंड तर उन्हाळ्यात अतिशय उष्ण अशा अवस्थेतून केळी पिक जात आहे. गारपीट, तर केव्हा वारा वादळ यामुळे केळी पिकाचे अतोनात नुकसान होते.

पण अशा परिस्थितीत नेट हाऊस तंत्रज्ञान वापरले तर केळीचे साधे पान सुद्धा फाटत नाही. संपूर्ण बाग सुरक्षित राहते. असे नुकसान मागील काळात बऱ्याचदा होताना पहिले आहे. मग केळीच्या शेतीला शाश्वत करायचे असेल तर काय हा प्रश्न उभा ठाकला आणि त्यातूनच प्रोटेक्टेड पद्धतीने केळी लागवडीचा पर्याय पुढे आला.

बंदिस्त वातावरणातील केळी लागवडीसाठी आठ मिटर उंचीचे डोम टाइप नेट हाऊस उभारले जातात त्याला एक्सेस कंट्रोल दिला जातो. छताच्या खाली फॉगर आणी सुक्ष्म फवारा सिस्टम तसेच केळीच्या बेड वर दोन लॅटरल देऊन व त्यावर केळीची लागवड केली जाते. हवामान बदलावर केळी उत्पादकांना विजय प्राप्त करायचा असेल तर बंदीस्त केळी लागवड पर्याय ठरू शकतो.

अधिक वाचा: आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड

नेटहाऊस मध्ये केळी लागवडीचे फायदे
• वारा, वादळ, गारपीट या पासून बागेचे पूर्णपणे संरक्षण.
• कोणत्याही वातावरणात व हंगामात केळी लावणे शक्य.
• नेट हाऊस मध्ये छताखाली फॉगर व मायक्रो स्प्रिंकलर लावलेले असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान नियंत्रण करता येते.
• नेट हाऊस मध्ये आर्द्रता वाढवता येते.
• स्प्रिंकलरद्वारे बागेला पानातून फिडींग करता येते.
• केळी बंदीस्त वातावरणात असल्यामुळे बागेवर किडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते त्यामुळे सीएमव्ही रोग लागण होण्याची शक्यता कमी.
• स्प्रिंकलर व फॉगर असल्यामुळे त्यातून बुरशी नाशकांची फवारणी करता येते.
• बाग नेटहाऊसमध्ये असल्यामुळे बड इन्जेक्शन व बंच स्प्रेची गरज नसल्यामुळे उत्तम गुणवत्ता व खर्चात बचत.
• निर्यातक्षम गुणवत्तेची बाग नऊ महिन्यात कापणीला तयार होते.
• नेट हाऊस मधील बागेत एकाच गेट मधून प्रवेश असल्यामुळे व गेट मध्येच डिसइंफेक्टंस टाकलेले असल्यामुळे पनामा व इतर रोगांना आळा बसतो.

Web Title: Protection of bananas from wind, storm, hail; New technology has arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.