Join us

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी भात पिकात करा ह्या वनस्पतीची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:29 IST

अझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, क्षारांचे प्रमाण १० ते १५ टक्के व महत्वाची प्रथिने घटके ७ ते १० टक्के या प्रमाणात आढळतात.

अझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, क्षारांचे प्रमाण १० ते १५ टक्के व महत्वाची प्रथिने घटके ७ ते १० टक्के या प्रमाणात आढळतात. भातशेतीसाठी अझोला उपयुक्त ठरते कारण ती जमिनीची सुपीकता वाढवते आणि भाताचे उत्पादन अधिक करते.

अझोला ही जलचर वनस्पती आहे, ज्यामुळे ती भातशेतीत सहज वापरता येते. तिच्या पानांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता असते. अझोला वेगाने वाढते आणि तिचा वापर जैविक खत, जनावरांचे खाद्य आणि माती सुधारक म्हणून करता येतो.

भातशेतीत अझोला लागवड का करावी?◼️ अझोला जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे भाताच्या वाढीसाठी अतिरिक्त रासायनिक खतांची गरज कमी होते.◼️ अझोला वापरल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि खनिजे वाढतात.◼️ अझोला पाण्यातील बाष्पीभवन कमी करून पाण्याची बचत करते.◼️ शेतीचा खर्च कमी अझोलाचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.

अझोला लागवड व नियोजन◼️ भात शेतीमध्ये अझोला लागवड करण्यासाठी जमिनीत २-३ इंच पाणी साठवा. जमीन सपाट असणे आवश्यक आहे.◼️ पाण्याच्या पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारची अडथळा येणार नाही याची काळजी घ्या.◼️ जमिनीची तयारी जमीन तयार झाल्यानंतर भाताच्या रोपांमध्ये आधीपासूनच लावलेला अझोला वापरता येतो.◼️ बाजारातून अर्धा किलो फ्रेश अझोला आणून त्याची लागवड करू शकता.◼️ अझोला पेरणी अझोलाचे बी तयार शेतात टाकावीत. लागवडीच्या ७-१० दिवसांत अझोला पसरते आणि तयार होते.◼️ यात पाण्याची पातळी कायम ठेवणे आवश्यक आहे.◼️ अझोला नियमित काढून खतासाठी वापरावे, यामुळे नवीन अझोलाला जागा मिळते.

अझोला लागवड ही भातशेतीसाठी लाभदायक, खर्च बचतीची पद्धत आहे. शेतकऱ्यांनी अझोलाचा वापर करून भातशेतीतील उत्पादन आणि जमिनीची सुपीकता वाढवावी.

अधिक वाचा: Pik Vima Hapta : यंदा पीकविमा हप्त्यासाठी शेतकऱ्यांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे; वाचा सविस्तर

टॅग्स :भातपीकखतेपीक व्यवस्थापनपाणीशेतकरीशेती