राज्यातील सर्व शेत जमिनींच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदींना महसूल विभागाने कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे डिजिटल सातबारा, तलाठ्याच्या सहीविना अधिकृत मानल्या जातील.
७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे हे सर्व सरकारी, निमशासकीय तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरतील.
महाभूमी पोर्टलवरून अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळणार आहे. सातबारा जमिनीची यात मालकी, क्षेत्रफळ, लागवड व हक्कातील बदल यांची माहिती असते.
डिजिटल सातबारा हा मालकी हक्क दाखवतो, तर आठ-अ मध्ये एका व्यक्तीच्या सर्व जमिनींची एकत्रित माहिती असते. फेरफार उतारा म्हणजे ७/१२ उताऱ्यामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद, जसे की खरेदी-विक्री आणि वारसा.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांना सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामकाजासाठी कायदेशीर आणि वैध म्हणून स्वीकारण्याचा शासकीय निर्णय (जीआर) जारी केला आहे.
या उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी (क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांक) असणार आहे, ज्यामुळे ते पूर्णपणे वैध ठरतील. महाभूमी या अधिकृत पोर्टलला भेट द्या. ७/१२, आठ-अ किंवा फेरफार उतारा निवडा. आवश्यक माहिती भरा आणि डिजिटल पेमेंट करा.
तलाठ्यांकडे जायची गरज नाही
◼️ घरबसल्या mahabhumi.gov.in या महाभूमी पोर्टलवरून अवघ्या प्रत्येकी १५ रुपयांत ७/१२, आठ-अ आणि फेरफार उतारा मिळणार आहे.
◼️ हे उतारे कायदेशीर असून, त्यांना पूर्णपणे सरकारी मान्यता मिळाली आहे.
◼️ त्यामुळे सरकारी कामकाज, कर्जप्रक्रिया आणि इतर व्यवहारांसाठी तलाठ्यांच्या कार्यालयाला जाण्याची गरज नाही.
कसा डाउनलोड कराल सातबारा उतारा?
◼️ महाभूमी या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
◼️ ओटीपी बेस्ड लॉगिन पर्याय निवडा.
◼️ तुमचा मोबाईल नंबर टाका.
◼️ सेंड ओटीपी म्हणा.
◼️ आलेला ओटीपी खाली टाका आलेला ओटीपी खाली टाका आणि व्हेरिफाय म्हणा.
◼️ यानंतर तुम्हाला सातबारा व आठ यापैकी कोणते कागदपत्र काढायचे आहे त्यानुसार त्याची निवड करा.
◼️ नंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा.
◼️ गट नंबर किंवा सर्वे नंबर टाका.
◼️ खालील रखाण्यामध्ये क्लिक करा क्लिक करा.
◼️ पिक पाहणीचा पर्याय निवडा.
◼️ डाउनलोड टॅब वरती क्लिक करून डाउनलोड करा.
(यासाठी तुम्हाला तुमचे खाते रिचार्ज करणे गरजेचे आहे. रिचार्ज अकाउंट या टॅबवर जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे भरू शकता. पैसे भरूनच सातबारा डाउनलोड करता येईल.)
अधिक वाचा: Saur Krushi Pump : आता दहा टक्के रक्कम भरा आणि सौर कृषिपंप मिळवा; काय आहे योजना?
