Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे बाजरी पिकात मोठे यश; लोहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या 'या' दोन वाणांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:12 IST

biofortified bajra variety वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या बाजरीच्या (जैवसंपृक्त) दोन संकरीत वाणांना मान्यता मिळाली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या बाजरीच्या (जैवसंपृक्त) दोन संकरीत वाणांना मान्यता मिळाली आहे.

या वाणांची भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाकडून (Protection of Plant Varieties and Farmers Rights Authority-PPV&FRA) अधिकृत नोंदणी मिळाली आहे.

ही नोंदणी विद्यापीठासाठी अत्यंत गौरवास्पद असून संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सततच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे शक्य झाले.

तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे मोलाचे सहकार्य व शास्त्रीय मार्गदर्शन लाभले. याशिवाय या प्रक्रियेत नोडल अधिकारी डॉ. व्ही. एन. चिंचणे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

ही नोंदणी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सातत्यपूर्ण संशोधन कार्याची पावती असून विकसित झालेल्या या संकरित जाती शाश्वत शेतीस चालना देणाऱ्या ठरणार आहेत.

त्यामुळे मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे.

या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल. त्यामुळे ही नोंदणी शेतकरी, संशोधक व विद्यापीठ यांच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील सर्व संबंधित शास्त्रज्ञ, संशोधक व कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

बाजरीचा संकरीत वाण ‘एएचबी-१२०० Fe’◼️ हा वाण २०१७ साली प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेष शिफारस करण्यात आली आहे.◼️ या वाणाचा पिकाचा कालावधी केवळ ८० ते ८५ दिवस इतका असून अल्प कालावधीत भरघोस उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे.◼️ हेक्टरी धान्य उत्पादन २५ ते ३० क्विंटल तर कडबा उत्पादन ५५ ते ६० क्विंटल इतके मिळते.◼️ या वाणाची कणसे घट, दाणे टपोरे असून त्यांचा रंग हिरवट आहे.◼️ तसेच फुटव्याचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते.◼️ १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतके असून धान्य दर्जेदार मिळते.◼️ या वाणामध्ये लोहाचे सरासरी प्रमाण ८८ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. तर जस्ताचे प्रमाण ४३ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. इतके असून पोषणमूल्याच्या दृष्टीने हा वाण अतिशय महत्त्वाचा आहे.◼️ त्यामुळे या वाणाची संपूर्ण देशात प्रसारासाठी शिफारस करण्यात आली आहे.◼️ विशेष म्हणजे हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे रोगांपासून होणारे नुकसान कमी होते.◼️ त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे.

बाजरीचा संकरीत वाण ‘एचबीबी-१२६९ Fe’◼️ हा वाण सन २०१८ मध्ये प्रसारित करण्यात आला असून खरीप हंगामासाठी विशेषतः शिफारस करण्यात आली आहे.◼️ हा वाण ८० ते ८२ दिवसांत तयार होतो.◼️ याची धान्य उत्पादकता प्रतिहेक्टरी ३० ते ३२ क्विंटल तर कडबा उत्पादन ७२ ते ७५ क्विंटल इतके मिळते.◼️ या वाणाचे कणीस घट्ट व टपोरे असून दाण्यांचा रंग हिरवट आहे.◼️ फुटव्याचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादनात वाढ होते.◼️ १००० दाण्यांचे वजन १५ ते १८ ग्रॅम इतके आहे.◼️ या वाणामध्ये पोषणमूल्येही अधिक असून लोहाचे प्रमाण सरासरी ९१ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. व जस्ताचे प्रमाण ४५ मि.ग्रॅ./कि.ग्रॅ. इतके आहे.◼️ त्यामुळे हा वाण पोषणदृष्ट्या समृद्ध मानला जात आहे.◼️ या गुणवत्तेमुळे संपूर्ण देशात प्रसार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.◼️ तसेच हा वाण गोसावी व करपा रोगास प्रतिकारक असल्यामुळे उत्पादनात स्थिरता मिळते व शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.◼️ त्यामुळे मराठवाड्यासह इतर कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हा बाजरी वाण फायदेशीर ठरणार आहे.

अधिक वाचा: फक्त २० हजार रुपयांच्या खर्चात घेतले १२० टन उसाचे विक्रमी उत्पादन; कशी केली किमया? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Agricultural University's Pearl Millet Success: Two Hybrid Varieties Approved

Web Summary : Marathwada Agricultural University achieves recognition for two biofortified pearl millet hybrid varieties, AHB 1200Fe and AHB 1269Fe, enhancing production and farmer income in dryland regions with disease resistance and high iron and zinc content.
टॅग्स :बाजरीशेतकरीशेतीपीकपरभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठकेंद्र सरकारसरकारलागवड, मशागतमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक