रब्बी हंगामातील पिकांची काढणी तसेच मळणी सुरु झाली आहे. मळणी यंत्र वापरताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षित मळणी करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया.
आज मळणी यंत्रे स्वयंचलित, पोर्टेबल, आणि बहुपीकांसाठी अनुकूल आहेत. आधुनिक काळात यामध्ये स्मार्ट तंत्रज्ञान, सोलर एनर्जीचा वापर, आणि मल्टी-कटिंग यंत्रणा दिसून येतात.
यंत्र चालवण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
- योग्य प्रशिक्षण
मळणीयंत्र कसे चालवायचे, याचे योग्य प्रशिक्षण घ्या. मॅन्युअल किंवा निर्मात्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.
- जागेची निवड
यंत्र चालवण्यासाठी सपाट आणि स्वच्छ जागेची निवड करा. यंत्राजवळ लहान मुले किंवा प्राणी येणार नाहीत याची खात्री करा.
- तांत्रिक तपासणी
यंत्र चालू करण्यापूर्वी ड्रम, बेल्ट, वायर वगैरे व्यवस्थित तपासा. गंज किंवा तुटलेले भाग असतील तर ते बदलून घ्या.
- योग्य उर्जा स्त्रोत
वीज, इंधन किंवा सौर ऊर्जा पुरवठा योग्य आणि सुरक्षित आहे याची खात्री करा.
- सुरक्षा उपकरणे
हातमोजे, गॉगल्स, आणि कान संरक्षक (इयर प्लग) घालून यंत्र चालवा.
मळणी यंत्र चालवताना घ्यायची काळजी
- सुरक्षित अंतर राखा
यंत्र चालवताना हात, कपडे, किंवा इतर वस्तू यंत्राच्या जवळ नेऊ नका.
- पिकाची योग्य फीडिंग
पीक मळणीसाठी योग्य प्रमाणात टाका, जास्त टाकल्यास यंत्र जाम होण्याची शक्यता असते.
- वेग नियंत्रित ठेवा
यंत्राच्या ड्रमचा वेग पिकाच्या प्रकारानुसार समायोजित करा. आवश्यकता नसताना वेग जास्त करू नका.
- स्वच्छता ठेवणे
मळणीदरम्यान यंत्राच्या जवळ कचरा किंवा धान्य साचू देऊ नका.
- अपघात टाळा
चालू यंत्राची तपासणी करू नका. बेल्ट, ब्लेड किंवा ड्रममध्ये कोणत्याही वस्तू अडकणार नाही याची काळजी घ्या. धुम्रपान करणे टाळा.
मळणी यंत्र बंद केल्यानंतर घ्यायची काळजी
- पूर्णपणे बंद करा
वीज किंवा इंधनाचा पुरवठा बंद करा. यंत्र थंड झाल्याशिवाय त्याची साफसफाई करू नका.
- साफसफाई
यंत्रातील धान्य, कचरा, व धूळ पूर्णपणे काढून टाका. ब्लेड, ड्रम, आणि फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करा.
- देखभाल
नियमितपणे यंत्राला ग्रीसिंग आणि ऑइलिंग करा. खराब झालेले भाग वेळेवर बदला.
- स्टोरेज
यंत्र कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. गंज होऊ नये म्हणून यंत्र झाकून ठेवा.
अधिक वाचा: Satbara Durusti : सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर