Join us
Daily Top 2Weekly Top 5

Zero Energy Cool Chamber : शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर! वीज न वापरता शेतमाल साठवण्याची सोपी ट्रिक; नफाही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:13 IST

Zero Energy Cool Chamber : शेतमाल साठवताना होणारे नुकसान ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. पण आता वीज न वापरता आणि कमी खर्चात फळे-भाज्या ताज्या ठेवण्याची भन्नाट पद्धत समोर आली आहे. नेमकं हे तंत्रज्ञान कसं काम करतं आणि तुम्ही ते कसं वापरू शकता वाचा सविस्तर (Zero Energy Cool Chamber)

Zero Energy Cool Chamber : आजच्या बदलत्या हवामानात आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी शेतमालाची सुरक्षित साठवणूक ही मोठी समस्या बनली आहे.(Zero Energy Cool Chamber)

मात्र आता कमी खर्चात आणि कोणतीही वीज न वापरता शेतमाल ताजा ठेवण्याची प्रभावी पद्धत उपलब्ध झाली आहे.(Zero Energy Cool Chamber)

'झिरो एनर्जी कूल चेंबर' ही तंत्रज्ञानाधारित पण सोपी पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.(Zero Energy Cool Chamber)

काय आहे 'झिरो एनर्जी कूल चेंबर'?

ही एक नैसर्गिक शीतगृह पद्धत असून विटा, वाळू आणि पाण्याच्या साहाय्याने तयार केली जाते.

याला 'शेतकऱ्यांचा फ्रिज' असेही म्हटले जाते.

या चेंबरमध्ये बाहेरील तापमानापेक्षा १० ते १५ अंशांनी कमी तापमान आणि सुमारे ९०% आर्द्रता राखली जाते.

कसे कार्य करते हे तंत्रज्ञान?

ही पद्धत 'बाष्पीभवन शीतकरण' (Evaporative Cooling) या तत्त्वावर आधारित आहे.

दोन भिंतींमध्ये ओल्या वाळूचा थर ठेवला जातो

पाण्याचे बाष्पीभवन होताना उष्णता बाहेर फेकली जाते

आतल्या भागात थंड व ओलसर वातावरण तयार होते

यामुळे फळे आणि भाज्या अधिक काळ ताज्या राहतात.

कसे तयार कराल कूल चेंबर?

हे चेंबर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध आणि स्वस्त आहे.

विटा, वाळू, बांबू, गवत

सावलीत आणि पाण्याच्या जवळ जागा निवडणे

दुहेरी भिंत तयार करून मध्ये ओल्या वाळूचा थर भरणे

वर गवताचे छप्पर देणे

योग्य पद्धतीने बांधल्यास हे चेंबर दीर्घकाळ उपयोगी ठरते.

शेतकऱ्यांसाठी फायदे

वीज न लागल्याने खर्च शून्य

फळे-भाज्यांचा साठवण कालावधी वाढतो

शेतमालाचे वजन व गुणवत्ता टिकून राहते

तातडीने विक्रीची गरज नसल्याने चांगला भाव मिळतो

दूध, दही व रोपेही काही काळ सुरक्षित ठेवता येतात

ऋतूनुसार उपयोग

उन्हाळा: सर्वाधिक प्रभावी, तापमान १०-१५°C ने कमी

हिवाळा: ओलावा टिकून राहिल्याने भाज्या ताज्या

पावसाळा: मर्यादित प्रभाव, पण संरक्षणासाठी उपयुक्त

महत्त्वाची सूचना

कांदा आणि लसूण यांसारख्या पिकांची साठवण या चेंबरमध्ये करू नये, कारण त्यांना कोरडी हवा आवश्यक असते.

'झिरो एनर्जी कूल चेंबर' हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक साठवणुकीचा उत्तम पर्याय ठरत आहे. योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकते.

(लेखक डॉ. अंगद प्र. गरडे, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग,छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.)

मोबाईल: 8408838450

(लेखिका प्रा. अंकिता काळे (गरडे), माजी सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे कार्यरत होत्या.)

हे ही वाचा सविस्तर : Summer Orchard Management : उन्हाळ्यातही फळबाग राहील हिरवीगार; करा 'हे' ५ महत्त्वाचे उपाय

अधिक वाचा : Heatwave Health Tips : उन्हामुळे शरीर ‘ड्राय’ होतंय? काय खावे-टाळावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

English
हिंदी सारांश
Web Title : Zero Energy Cool Chamber: Saving crops without electricity, boosting farmer profits.

Web Summary : The Zero Energy Cool Chamber offers farmers a low-cost, eco-friendly way to store produce. Using bricks, sand, and water, it keeps fruits and vegetables fresh longer, reducing spoilage and increasing profits by eliminating the need for immediate sales.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेभाज्या