Heatwave Health Tips : वाढत्या उन्हामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.(Heatwave Health Tips)
उष्णतेमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स घामावाटे कमी होत असल्याने हायड्रेशन राखणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.(Heatwave Health Tips)
तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि पुरेसे पाणी घेतल्यास उष्माघातासारख्या समस्या टाळता येऊ शकतात.(Heatwave Health Tips)
पाण्याने समृद्ध आहाराची गरज
आहारतज्ज्ञ प्रज्ञा बरालिया यांच्या मते, उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
कलिंगड, खरबूज, आंबा, पपई यांसारखी हंगामी फळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवतात. या फळांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
पारंपरिक पेये ठरतात उपयोगी
उन्हाळ्यात ताक, नारळपाणी, लिंबूपाणी, जलजीरा, आवळा सरबत, कोकम सरबत आणि कैरीचे पन्हे यांसारखी पारंपरिक पेये अत्यंत प्रभावी ठरतात.
ही पेये शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखतात आणि उष्माघातापासून संरक्षण करतात.
विशेषतः ताक, लस्सी आणि कढी यांसारखे पदार्थ शरीर थंड ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
दररोज ८ ते १० ग्लास पाणी आवश्यक
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, प्रौढ व्यक्तींनी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित अंतराने पाणी प्यावे.
प्रोबायोटिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा आणि कोल्ड्रिंक किंवा जास्त साखरयुक्त पेये टाळावीत.
हलका आणि संतुलित आहार महत्त्वाचा
उन्हाळ्यात हलका, कमी तेलकट आणि सहज पचणारा आहार घेणे फायदेशीर ठरते. संपूर्ण धान्य, डाळी, ताज्या भाज्या आणि दही यांचा समावेश असलेला संतुलित आहार शरीरासाठी उपयुक्त ठरतो. जड, अतिमसालेदार आणि शिळे अन्न टाळणे आवश्यक आहे.
काय करावे?
* दर अर्ध्या तासाने पाणी प्या
* ओआरएस, लिंबूपाणी, ताक, पन्हे यांचा वापर करा
* दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा
* डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा ओल्या कापडाचा वापर करा
* हलके, सुती आणि सैल कपडे परिधान करा
* बाहेर काम करताना सावलीत विश्रांती घ्या
काय टाळावे?
* उन्हात जड कामे करणे टाळा
* दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये टाळा
* शिळे व अतिप्रथिनयुक्त अन्न टाळा
* लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका
तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
उन्हामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी कोणताही त्रास जाणवल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वाढत्या तापमानात योग्य आहार, पुरेसे पाणी आणि काळजी घेतल्यास आरोग्य सुदृढ ठेवणे शक्य आहे.
शेतकऱ्यांसाठी टिप्स
* डोक्यावर टोपी/गमछा वापरा
* दर ३०-४५ मिनिटांनी पाणी प्या
* दुपारी १२ ते ३ या वेळेत काम टाळा
* ताक, लिंबूपाणी, ओआरएसचा वापर करा
उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे व भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. कलिंगड, खरबूज, आंबा आणि पपई यांसारखी हंगामी फळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. - प्रज्ञा बरालिया, आहारतज्ज्ञ
हे ही वाचा सविस्तर : Smart Farming Tips : शेतीत तोटा का होतो? ‘या’ ४ चुका थांबवा, नफा वाढवा!
