Mahadbt Labharthi : महाडीबीटीच्या (Mahadbt) माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना योजनांचे लाभ मिळत आहे. शिवाय प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना यात प्राधान्य देखील दिले जात आहे. त्यामुळे अर्ज करण्यापासून ते लाभार्थ्यांच्या निवडीपर्यंत, यादीपर्यंत या पोर्टलवर आपल्याला, शेतकऱ्याला प्रत्येक बाब पाहायला मिळते.
जर समजा तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल किंवा कुणाला कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे, हे पाहायचे असेल तर या पोर्टलवर ही सुविधा देखील उपलब्ध आहे.
अशी पहा गावनिहाय लाभार्थी यादी
- सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेस्थळावर जायचे आहे.
- या ठिकाणी निधी वितरित लाभार्थी या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाची निवड करा.
- आपल्यासमोर अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, बाब प्रकार, घटकाचे नाव, योजनेचे नाव, निधी वितरण आदी तपशील, माहिती दिसून येईल.