Lokmat Agro >स्मार्ट शेती > Wheat, Harbhara Crops : गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट टाळण्यासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Wheat, Harbhara Crops : गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट टाळण्यासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Latest News Wheat, Harbhara Crops to prevent decline in wheat and gram crop production, read in detail | Wheat, Harbhara Crops : गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट टाळण्यासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Wheat, Harbhara Crops : गहू, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट टाळण्यासाठी हे कराच, वाचा सविस्तर 

Wheat, Harbhara Crops : हरभरा व गहू पिकावरील रोग आणि किडींचे नियंत्रण न केल्यास पीक उत्पादनात (Crop Production) ४० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता असते. 

Wheat, Harbhara Crops : हरभरा व गहू पिकावरील रोग आणि किडींचे नियंत्रण न केल्यास पीक उत्पादनात (Crop Production) ४० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता असते. 

शेअर :

Join us
Join usNext

Wheat, Harbhara Crops : हरभरा व गहू पिके (Wheat, Harbhara Crops Management) सध्या मुख्य वाढीच्या अवस्थेत असून पिकांना आवश्यक असलेली थंडी पडत असली तरी अधूनमधून ढगाळ हवामानामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे. हरभरा व गहू पिकावरील रोग आणि किडींचे नियंत्रण न केल्यास पीक उत्पादनात (Crop Production) ४० टक्क्यापर्यंत घट येण्याची शक्यता असते. 

गहू पिकाची काळजी 

  • गव्हावरील तांबेरा रोगाची लागण दिसून येताच मॅंकोझेब/झायनेब ७५ डब्ल्यूपी बुरशीनाशकाची ३० ग्रॅ. दहा लिटर पाण्यातून किंवा प्रोपीकोनाझोल २५ % इसी १० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • गरजेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी. 
  • गहू पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड + मॅन्कोझेब प्रत्येकी २० ग्रॅ. १० लिटर पाण्यातून फवारावे. 
  • दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी. 
  • गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यूजी, १ ग्रॅ. किंवा ॲसिटामीप्रिड २० एसपी, ५ ग्रॅ. १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 

 

हरभरा पिकाची काळजी 

  • हरभऱ्यावरील मर  रोग हा पिकास जास्त पाणी दिल्याने तसेच जमिनीत जास्त दिवस जास्त प्रमाणात ओल राहिल्याने किंवा पेरणीच्या वेळी बियाणावर बीजप्रक्रिया न केल्याने होतो. 
  • यासाठी पिकास योग्य प्रमाणात पाणी द्यावे, तसेच पेरणीपूर्वी बियाणावर आवर्जून बीजप्रक्रिया करावी. 
  • हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. 
  • दुसरी फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने हेलिओकिल या विषाणूजन्य जैविक कीटकनाशकाची ५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी. गरजेनुसार तिसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट ५% एसजी, ४ ग्रॅ. १० लिटर पाण्यातून करावी.

 

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

Web Title: Latest News Wheat, Harbhara Crops to prevent decline in wheat and gram crop production, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.