Wheat Crop Management : गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गहू उत्पादन प्रति हेक्टर कमी आहे.(Wheat Crop Management)
यामागे हवामानातील बदलांसोबतच गहू पिकावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. योग्य वेळी रोगांची ओळख व शास्त्रीय नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.(Wheat Crop Management)
गहू पिकामध्ये प्रामुख्याने तांबेरा (गेरवा), काजळी (काणी), करपा, मूळकूज व खोडकूज हे रोग आढळतात.
तांबेरा (Gerva / Rust Disease)
तांबेरा हा गहू पिकावरील सर्वात घातक व नुकसानकारक रोग मानला जातो. या रोगामुळे दाणे सुकतात, वजन कमी होते व उत्पादनात मोठी घट होते.
तांबेराचे प्रकार
खोडावरील काळा तांबेरा
पानावरील नारिंगी तांबेरा
पिवळा तांबेरा
खोडावरील काळा तांबेरा
खोडावरील काळा तांबेरा
रोगकारक बुरशी : पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटीसी
लक्षणे काय?
ओंबी अवस्थेत पानांवर, खोडावर व ओंबीवर तपकिरी रंगाचे लांबट पूरळ दिसतात
हाताने स्पर्श केल्यास तपकिरी भुकटी लागते
तापमान वाढल्यावर पूरळ काळसर रंगाचे होतात
रोपांची वाढ खुंटते, फुटवे कमी होतात
अनुकूल हवामान : १५ ते ३५ अंश सेल्सियस तापमान व जास्त आर्द्रता
पानावरील नारिंगी तांबेरा
रोगकारक बुरशी : पक्सिनिया रेकॉनडिटा
लक्षणे काय?
पानांवर व देठांवर नारिंगी रंगाचे लहान गोल पूरळ
सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला, नंतर दोन्ही बाजूंना दिसतात
अनुकूल तापमान : १५ ते २५ अंश सेल्सियस
पिवळा तांबेरा
रोगकारक बुरशी : पक्सिनिया स्ट्रीफोरमीस
लक्षणे काय?
पानांच्या शिरांवर पिवळ्या रंगाचे बारीक पूरळ सरळ रेषेत
थंड व दमट हवामानात जास्त प्रमाणात आढळतो
तांबेरा रोगाचा प्रसार
हा रोग फक्त गहू पिकावर टिकतो
दक्षिण भारतातील निलगिरी व पलनी टेकड्यांमधून वादळी वाऱ्याने बीजाणू १८०० किमीपर्यंत पसरतात
अनुकूल हवामानात मैदानी भागात रोग झपाट्याने वाढतो
तांबेरा रोग नियंत्रण उपाय काय?
* वेळेवर पेरणी करावी
* रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी
* नत्र खताचा अतिरेक टाळावा
* अति पाणी देऊ नये
रोग दिसताच 'ही' फवारणी करावी
* प्रोपीकोनॅझोल १ मि.ली./लिटर पाणी
* किंवा मँकोझेब २ ग्रॅम/लिटर पाणी
* गरज असल्यास १५ दिवसांनी पुनः फवारणी
काजळी (काणी रोग)
रोगकारक बुरशी : युस्टीलँगो ट्रिटीसी
लक्षणे काय?
* दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते
* थंड व आर्द्र हवामानात रोग जास्त वाढतो
नियंत्रण उपाय काय?
* रोगमुक्त बियाण्याची निवड
* उष्णजल बीजप्रक्रिया :
४ तास थंड पाण्यात भिजवणे
नंतर ५४ अंश सेल्सियस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे
* रासायनिक बीजप्रक्रिया :
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम/किलो बियाणे
रोगट ओंब्या काढून नष्ट कराव्यात
करपा रोग
रोगकारक बुरशी : अल्टरनेरिया ट्रिटीसिना
लक्षणे काय?
पानांवर करपट ठिपके
ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते
बागायती गव्हावर जास्त प्रादुर्भाव
नियंत्रण उपाय
* रोगमुक्त बियाणे वापर
* बीजप्रक्रिया : थायरम ३ ग्रॅम/किलो
* उभ्या पिकावर प्रादुर्भाव दिसल्यास
* मँकोझेब २० ग्रॅम / १० लिटर पाणी फवारणी
मूळकूज व खोडकूज
रोगकारक बुरशी
मूळकूज : फ्युजारियम
खोडकूज : रायझोक्टोनिया
लक्षणे काय?
रोपे पिवळी पडून सुकतात
मुळे व खोडाचा खालचा भाग कुजतो
झाडे कोलमडून पडतात
नियंत्रणाचे उपाय
* बीजप्रक्रिया : थायरम ३ ग्रॅम/किलो
* पाणी साचणार नाही याची काळजी
* संतुलित खत व्यवस्थापन
गहू पिकातील रोगांचे वेळीच निदान, प्रतिबंधात्मक उपाय व शिफारशीनुसार रासायनिक फवारणी केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांच्या शिफारशीप्रमाणेच व्यवस्थापन करावे.
- डॉ. राजेंद्र गाडे, अमोल वि. शितोळे
(वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
