Juni Vihir Durusti : जुनी विहीर आणि बोअरवेल हे सिंचनाचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. शासनाकडून जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी, इनवेल बोअरिंग करीता अनुदान दिले जाते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना नेमकी कुठली कागदपत्रे लागतात, ते पाहुयात....
कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे
- 1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
- 2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असल्यास).
- 3) सातबारा उतारा ८ अ उतारा.
- 4) ग्रामसभेचा ठराव.
- 5) तलाठी यांच्याकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतुर्सिमा.
- 6) लाभार्थीचे बंधपत्र (१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर).
- 7) कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- 8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- 9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे, त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थीसह)
- 10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
- 11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
- 12) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
Navin Vihir Yojana : नवीन विहीर योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतात, पहा संपूर्ण डाकुमेंट्सची यादी
