Vegetable Farming : उन्हाळी हंगामात (Summer Season) भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात आणि भाजीपाला पिकांसाठी मांडव आणि ताटी पद्धत आधार देण्यासाठी वापरले जाते. यात वर जाणाऱ्या फांद्या या आडव्या तारेला दोन पदरी पद्धतीने बांधल्या जातात.
अशावेळी मुख्य वेलीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी बगल फूट आणि तणावे काढणे गरजेचे ठरते. विशेष म्हणजे मंडप आणि ताटी पद्धती मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बगल फुटवे आणि तणावे काढले जातात, ते नेमके कसे हे समजून घेऊया...
वेलवर्गीय भाजीपाला पिके बगलफूट व तणावे काढणे
- वेल वाढत असताना बगलफूट आणि तणावे काढावेत, पाने काढू नयेत.
- वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफूट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते.
- वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड केल्यापासून २० ते २५ दिवसांनी वेल ताटी किंवा मंडपावर सोडण्यासाठी सुतळीच्या साहाय्याने वर चढवावेत.
- तसेच मंडप पध्दतीमध्ये वेल मंडपावर पोहचल्यानंतर सर्व बगलफूटी काढाव्यात.
- ताटी पध्दतीमध्ये पहिल्या तारेपर्यंत वेलीवरच्या बगलफुटी काढून टाकाव्यात.
- त्यानंतर बगलफुटी / फांद्या काढू नये.
- मुख्य वेल मंडपावर पोहचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.
- ग्रामीण कृषि मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी.