Lokmat Agro >स्मार्ट शेती > Summer Crop Management : उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी 'हे' कराच, वाचा सविस्तर 

Summer Crop Management : उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी 'हे' कराच, वाचा सविस्तर 

Latest News Unhali Pike Management Do this to reduce water requirement of crops in summer, read in detail | Summer Crop Management : उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी 'हे' कराच, वाचा सविस्तर 

Summer Crop Management : उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची गरज कमी करण्यासाठी 'हे' कराच, वाचा सविस्तर 

Summer Crop Management : एकूणच खरीप किंवा रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी पिकांची पाण्याची गरज दुप्पट ते अडीच पट असते.

Summer Crop Management : एकूणच खरीप किंवा रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी पिकांची पाण्याची गरज दुप्पट ते अडीच पट असते.

शेअर :

Join us
Join usNext

Summer Crop Management : उन्हाळी हंगामातील (Summer Season) जास्तीचे तापमान, कोरडे हवामान, सोसाट्याचा वारा, इ. कारणांमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असते. त्यामुळे इतर हंगामाच्या तुलनेत जमिनीतील ओल लवकर कमी होते. 

त्याचप्रमाणे पिकाच्या माध्यमातून वातावरणात पाणी (Water Management) सोडण्याचे प्रमाणही उष्ण हवामानामुळे जास्त असते. एकूणच खरीप किंवा रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी पिकांची पाण्याची गरज दुप्पट ते अडीच पट असते. त्याकरिता पिकांना वरचेवर पाणी द्यावे लागत असल्याने पाण्याच्या एकूण जास्त पाळ्या द्याव्या लागतात. 

उन्हाळी पिकांमध्ये (Summer Crops) पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने आच्छादनाच्या वापराला महत्त्व आहे. बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. शेतातील उपलब्ध काडीकचरा, गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, पिकाची धसकटे तसेच प्लास्टिकचा आच्छादन म्हणून वापर केल्यास पिकाची पाण्याची गरज ३० ते ४० टक्क्यांनी कमी होते तसेच पिकात तणांचा प्रादुर्भावही कमी राहतो. 

Kanda Sathavnuk : कांदा साठवणीमध्ये नुकसान टाळण्यासाठी 'या' चुका टाळा, वाचा सविस्तर     


पाण्यावर नियंत्रण आणता येते.... 
बाष्पनिष्कासन निरोधकाच्या वापराने जमिनीच्या पृष्ठभागावरून तसेच पिकाच्या पानावाटे निघून जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण आणता येते. त्यासाठी केओलीन पावडर ८ टक्के  (१० लिटर पाण्यात ८०० ग्राम) या प्रमाणात पाण्यात मिसळून तयार झालेले द्रावण पिकावर फवारल्याने पिकाच्या पानांवर पांढऱ्या रंगाचा थर तयार होतो. पिकावर पडणारी सूर्यकिरणे या पांढऱ्या रंगामुळे परावर्तित होतात. त्यामुळे पानाचे तापमान कमी होऊन पानावाटे होणारा पाण्याचा नाश आटोक्यात ठेवता येतो. पर्यायाने जमिनीतील ओल जास्त काळ टिकून ठेवण्यास मदत होते.  
      
ऊसाच्या पिकासाठी... 
उन्हाळी हंगामात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने उसासारख्या पिकामध्ये शेंड्याकडील पूर्ण उघडलेली ६ ते ७ पाने ठेवून उसाची उरलेली खालच्या बाजूची पाने काढून टाकावीत. एकूण पानांची संख्या कमी केल्याने पानावाटे होणारे पर्णोत्सर्जन कमी करता येते. त्याचप्रमाणे उसाच्या पिकाला प्रत्येक पाण्याच्या पाळीत आलटून पालटून सरी भिजवून उन्हाळी हंगामात ऊस पिक किमान जगवता येते.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त शास्रज्ञ कृषी विद्यापीठ

 

Web Title: Latest News Unhali Pike Management Do this to reduce water requirement of crops in summer, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.