Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tractor Servicing : घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून वाचवा हजारो रुपये, जाणून घ्या सविस्तर 

Tractor Servicing : घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून वाचवा हजारो रुपये, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Tractor Servicing Save thousands of rupees by servicing your tractor from home, know the details | Tractor Servicing : घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून वाचवा हजारो रुपये, जाणून घ्या सविस्तर 

Tractor Servicing : घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून वाचवा हजारो रुपये, जाणून घ्या सविस्तर 

Tractor Servicing : घरच्या घरी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करायची असल्यास कशाप्रकारे करायची? हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात... 

Tractor Servicing : घरच्या घरी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करायची असल्यास कशाप्रकारे करायची? हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात... 

शेअर :

Join us
Join usNext

Tractor Servicing : ट्रॅक्टर म्हटला (Tractor) की त्यात अनेकदा अडचणी येत असतात. त्यामुळे ट्रॅक्टर थेट सर्व्हिसिंगला (Tractor Servicing) घेऊन जाणे आवश्यक ठरते. अशावेळी जर घरबसल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कशी करायची हे माहित असेल तर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जर घरच्या घरी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करायची असल्यास कशाप्रकारे करायची? हे या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात... 

ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कधी करावी?
सर्वप्रथम, तुम्हाला ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कधी करावी लागते, याची नोंद ठेवावी लागेल. यासाठी ओडोमीटरची नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हाही तुमचा ट्रॅक्टर 250 ते 300 तास चालतो, तेव्हा समजा सर्व्हिसिंगची वेळ आली आहे. जर तुमचा ट्रॅक्टर शेवटच्या सर्व्हिसिंगपासून 300 तास चालला असेल, तर लवकरात लवकर सर्व्हिसिंग करून घ्या, जर असे केले नाही तर हळूहळू ट्रॅक्टरची कार्यक्षमता कमी होऊ लागते. 

कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल?
ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करण्यासाठी बाजारातून काही वस्तू खरेदी कराव्या लागतील. यातील पहिली गोष्ट म्हणजे त्याचे इंजिन ऑइल. ट्रॅक्टरचे मॉडेल आणि इंजिन क्षमतेनुसार इंजिन तेलाचे प्रमाण खरेदी करा. ग्रीस कॅन, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर आणि डिझेल फिल्टर (बदलण्याची आवश्यकता असल्यासच खरेदी करा) आणि रेडिएटर कूलर. यासोबतच दुरुस्तीसाठी लागणारी साधने बाजारातून खरेदी करा.

ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कशी करावी?

  1. ट्रॅक्टरला सर्व्हिस करण्यासाठी सर्वप्रथम जुने इंजिन ऑइल काढून टाकावे लागते. सर्व प्रथम, एक पाना घ्या आणि ट्रॅक्टर इंजिनच्या तळाशी चेंबर बोल्ट उघडा. या बोल्टखाली बादली किंवा पॅन ठेवा, जेणेकरून जळलेले इंजिन तेल पसरणार नाही आणि जमा होणार नाही.
  2. यानंत डिझेल फिल्टर उघडा आणि ते काळजीपूर्वक काढून टाका आणि वेगळे करा. डिझेल फिल्टर पूर्णपणे स्वच्छ करा आणि आवश्यक असल्यास ते बदला. डिझेल फिल्टर प्रत्येक 250 ते 300 तासांनी बदलण्याचा प्रयत्न करा.
  3. आता ट्रॅक्टरचा एअर फिल्टर उघडा आणि स्वच्छ करा. जर एअर फिल्टर 250 ते 300 तासांच्या अंतराने बदलावे लागले तर लक्षात ठेवा. 
  4. जर एअर फिल्टर खूप जुना झाला असेल तर तो नक्कीच बदला. एअर फिल्टर तसेच फिल्टर ड्रम साफ करण्यास विसरू नका. त्यामुळे ट्रॅक्टरचे मायलेजही चांगले राहील आणि परफॉर्मन्सही चांगला राहील.
  5. यासोबतच हायड्रॉलिक फिल्टर देखील 250 ते 300 तास पूर्ण झाल्यानंतर बदलणे आवश्यक आहे. 
  6. जर तुम्ही ट्रॅक्टरचे ब्रेक उघडू शकत असाल तर ते उघडा आणि साफ करा. ट्रॅक्टरचे ब्रेक साफ करण्यासाठी डिझेल वापरा. 
  7. ट्रॅक्टरमध्ये इंजिन तेल भरण्यापूर्वी नवीन तेल फिल्टर करून घ्या.
  8. यानंतर, ट्रॅक्टरच्या इंजिनखाली चेंबर बोल्ट व्यवस्थित घट्ट करा आणि त्यात फनेल टाकून नवीन इंजिन तेल भरा. 
  9. इंजिन तेल भरल्यानंतर, इंजिनचे झाकण घट्ट करा. यासह, रेडिएटरचे कुलर तपासा. कमी असेल तर भरा. त्याचा पंखा बेल्टही घट्ट करा.
  10. शेवटी, संपूर्ण ट्रॅक्टरला ग्रीस आणि महत्वाच्या ठिकाणी ऑइल सोडून घ्या. सर्वकाही पूर्ण झाल्यावर, ट्रॅक्टर सुरू करून पहा. 
     

Second Hand Tractor : सेकंड हँड ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' गोष्टी हमखास लक्षात ठेवा!

Web Title: Latest News Tractor Servicing Save thousands of rupees by servicing your tractor from home, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.