SMAM Scheme : महिलांना सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने SMAM योजनेअंतर्गत ट्रॅक्टरवर ५० टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे केवळ अर्ध्या किमतीत महिलांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. काय आहे ही योजना, जाणून घेऊयात सविस्तर...
तर केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ही योजना राबवली जाते. या योजनेचा प्राथमिक उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत महिलांना विशेष लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात.
केंद्र सरकार ९० टक्के आणि राज्य सरकार १० टक्के निधी देतात. समजा एखाद्या महिला शेतकऱ्याला ४.५ लाख रुपयांचा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल. जर ट्रॅक्टरची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असेल, तर ५० टक्के सबसिडीचा अर्थ महिला शेतकरी २ लाख २५ हजार रुपये देईल, म्हणजेच महिला शेतकऱ्याला फक्त अर्धा खर्च द्यावा लागेल आणि उर्वरित अर्धा खर्च सरकार भरेल.
दरम्यान, जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याने तोच ट्रॅक्टर खरेदी केला तर त्यांना १ लक्ष ८० हजार रुपयांच्या ट्रॅक्टरसाठी ४० टक्के सबसिडीसह २ लाख ७० हजार रुपये द्यावे लागतील. परिणामी, महिला शेतकऱ्यांना पुरुष शेतकऱ्यांपेक्षा ४५ हजार रुपयांची सूट मिळेल. म्हणूनच ही योजना महिला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
कोणती कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, जमीन नोंदी (खसरा/खतौनी), पासपोर्ट-आकाराचा फोटो, उत्पन्न आणि जातीचा दाखला (जर आवश्यक असेल तर), महिला शेतकरी असल्याचा पुरावा (जसे की रेशन कार्ड किंवा शेतकरी नोंदणी)
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. त्यासाठी प्रथम अधिकृत पोर्टल https://agrimachinery.nic.in किंवा https://myscheme.gov.in ला भेट द्या.