Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक

आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक

Latest News Thunderstorms likely for next three days from today, protect harvested and threshed crops | आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक

आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांची अशी करा साठवणूक

Rain Alert : २०, २१ व २२ एप्रिल २०२६ रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण महत्वाचे आहे. 

Rain Alert : २०, २१ व २२ एप्रिल २०२६ रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण महत्वाचे आहे. 

Rain Alert : मुंबई वेधशाळेने दिलेला अंदाज, लक्षात घेता आज दि. १९ एप्रिल २०२६ रोजी (यलो अलर्ट) नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच २०, २१ व २२ एप्रिल २०२६ रोजी देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून संरक्षण महत्वाचे आहे. 

सामान्य पिकांसाठी सल्ला 

  • गारपीट किंवा पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता कापणी / मळणी व साठवणूक केलेले रब्बी पिकांना प्लास्टिक पेपर किंवा ताडपत्रीने झाकावे किंवा सुरक्षित जागेवर ठेवावे.
  • कापणी / मळणी केलेल्या पिकांना उन्हात वाळवून मगच साठवणूक करावी - कारण साठवणूक करतेवेळी धान्यात आद्रता असेल तर धान्य लवकर खराब - होऊ शकते.
  • मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीट किंवा मध्यम पावसापासून होणाऱ्या - संभाव्य नुकसान टाळण्या करीता उपायोजना कराव्यात.
  • कापणी / काढणी केलेली पिके शेतात उघडयावर ठेवू नये.
  • सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज लक्ष्यात घेता सल्ला देण्यात येतो कि नवीन लावलेले फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बांबू किंवा काठीच्या सहाय्याने आधार द्यावा.

कांदा पिकासाठी 
गारपीट किंवा मध्यम पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता काढणी केलेल्या रांगडा कांदा सुरक्षित जागेवर ठेवावा.

द्राक्ष बागेसाठी 

  • द्राक्ष बागेला प्लॅस्टिक कव्हर / हेलनेट झाकल्यास द्राक्ष बागेचे पावसापासून संरक्षण होईल.
  • अवकाळी पावसापूर्वी शेतातील माती वापसा स्थितीत असावी, जेणे करून मुळे पाणी शोषून घेत नाहीत आणि छत आणि गुच्छांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत ज्यामुळे बेरी क्रॅकिंगची समस्या उद्भवते.
  • द्राक्ष बागेत योग्य उतार असल्यास पावसाचे पाणी वाहून जाईल, अन्यथा द्राक्षबागेत आर्द्रता वाढली असती.
  • पाऊस जास्त झालेल्या परिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी. त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते.
  • द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे व बोद वाफसा स्थितीत राहतील अशी काळजी घ्यावी.
  • द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता कमी होण्यास मदत होईल.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी 

Web Title : बारिश का अलर्ट: अगले तीन दिनों के लिए रबी फसलों, अंगूर के बागों को सुरक्षित रखें

Web Summary : नाशिक में ओलावृष्टि की संभावना है। काटी गई फसलों को तिरपाल से सुरक्षित करें। छोटे पौधों को सहारा दें। अंगूर की बेलों को कवर से सुरक्षित रखें, जल निकासी सुनिश्चित करें और बेरी क्रैकिंग को रोकने के लिए पानी निकालें। विशेषज्ञ की सलाह का पालन करें।

Web Title : Rain Alert: Protect Rabi Crops, Grape Orchards for Next Three Days

Web Summary : Nashik faces potential hailstorms. Secure harvested crops with tarps. Support young trees. Protect grape vines with covers, ensure good drainage, and remove standing water to prevent berry cracking. Follow expert advice.