Pink Berry Grapes : द्राक्षांवरील 'पिंक बेरी' (Pink Berry) म्हणजे थंडीमुळे किंवा वातावरणातील बदलामुळे द्राक्ष मण्यांमधील हिरवा रंग गुलाबी/लालसर होणे; या समस्या किंवा लक्षणे दिसून येतात. मुख्यत्वे कोणत्या वाणावर ही लक्षणे जाणवतात, काय उपाय करावेत, हे समजून घेऊयात....
द्राक्षावरील पिंक बेरी
- जर दिवसाचे तापमान ३५ अंशांपर्यंत वाढलेले आणि रात्रीचे तापमान ७ ते ८ अंशांपर्यंत उतरले असल्यास तापमानातील तफावतीमुळे हिरव्या रंगाच्या द्राक्ष जातींमध्ये हिरव्या रंगद्रव्यांचे रूपांतर गुलाबी रंगद्रव्यामध्ये होते.
- अशा प्रकारची तापमानातील तफावत एका रात्रीमध्ये बागेतील पूर्ण घड गुलाबी करू शकते.
- द्राक्षमण्याचा जितका भाग किमान तापमानाच्या सान्निध्यात आला, तितके मणी गुलाबी दिसतात.
- एकाच द्राक्षघडामधील मण्याच्या रंगामध्ये फरक पडतो.
- द्राक्षे खाण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य ग्राहक एक सारख्या (हिरवा, लाल किंवा काळा) रंगाला प्राधान्य देतो.
- यावर आजपर्यंत कोणताही उपाय उपलब्ध किंवा कार्य करत असल्याचे दिसत नाही किंवा कोणत्याही रसायनाने गुलाबी रंगाचा मणी हिरवा झाल्याचे पाहण्यात आलेले नाही.
- मात्र किमान व कमाल तापमानातील दरी कमी तापमानातील दरा करण्यासाठी पाणी उतरण्याच्या आठ ते दहा दिवसांआधी किंवा किमान ७ ते ८ अंश सेल्सिअस येण्यापूर्वी प्रत्येक द्राक्षघड पेपरने झाकल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
- पेपरने घड झाकण्यापूर्वी भुरी आणि मिलीबग नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी.
- द्राक्ष बागेला गोणपाट किंवा साडीने किंवा शेड नेट बांधून थंडी पासून संरक्षण करावे.
- थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार / तुषार सिंचन च्या सहाय्याने पाणी द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
