Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : उन्हाळ बाजरी, भुईमूंग परिपक्वतेच्या अवस्थेत, कधीपर्यंत काढणी कराल, वाचा सविस्तर 

Agriculture News : उन्हाळ बाजरी, भुईमूंग परिपक्वतेच्या अवस्थेत, कधीपर्यंत काढणी कराल, वाचा सविस्तर 

Latest News Summer millet, groundnuts in maturity stage, till when will they be harvested, read in detail | Agriculture News : उन्हाळ बाजरी, भुईमूंग परिपक्वतेच्या अवस्थेत, कधीपर्यंत काढणी कराल, वाचा सविस्तर 

Agriculture News : उन्हाळ बाजरी, भुईमूंग परिपक्वतेच्या अवस्थेत, कधीपर्यंत काढणी कराल, वाचा सविस्तर 

Agriculture News : उन्हाळ बाजरी आणि उन्हाळी भुईमूंग पिकाच्या सध्याच्या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

Agriculture News : उन्हाळ बाजरी आणि उन्हाळी भुईमूंग पिकाच्या सध्याच्या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

Agriculture News : सध्या उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वतेच्या अवस्थेत आहे, तर उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

उन्हाळ बाजरी - दाणे भरणे ते परिपक्वता अवस्था

  • वाढते तापमान लक्ष्यात घेता दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बाजरी पिकाला पाण्याची तिसरी पाळी द्यावी. 
  • उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळुवार होते. 
  • त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १० ते १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते. 
  • बाजरीचे कणीस हाताने दाबले असता त्यातून दाणे सुटणे. 
  • तसेच दाताखाली दाणा चावल्यानंतर कट्ट असा आवाज आल्यास, पिक कापणीस योग्य आहे असे समजावे. 
  • ताटाची कणसे विळ्याने कापून गोळा करावीत व वाळवून मळणी करावी.

 

उन्हाळी भुईमूंग - आऱ्या उतरण्याची ते शेंगा लागण्याची अवस्था /शेंगा भरण्याच्या अवस्थेत

  • वाढते तापमान लक्ष्यात घेता शेंगा भरन्याच्या अवस्थेत भुईमुग पिकाला पाणी द्यावे.
  • भुईमूग शेंगा जमिनीत असल्याने त्यांची पक्वता ओळखणे थोडे कठीण काम आहे. 
  • भुईमुगाच्या प्रकारानुसार पक्वता कालावधी वेगवेगळा असतो. 
  • भुईमुग पीक काढणीयोग्य तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. पाने गळणे सुरू होते. 
  • शेंगाचे टरफल टणक बनते व टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागल्यास पिकाची काढणीकरून भुईमुगाच्या शेंगा चांगल्या वाळवून साठवणूक करावी.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : ग्रीष्मकालीन बाजरा, मूंगफली परिपक्वता: कटाई का समय और देखभाल युक्तियाँ

Web Summary : गर्मी के बाजरे को दाना भरने के समय पानी की आवश्यकता होती है। जब दाने आसानी से अलग हो जाएं तो कटाई करें। मूंगफली की कटाई पीले पत्तों और सख्त छिलकों से इंगित होती है। भंडारण के लिए उचित सुखाना महत्वपूर्ण है।

Web Title : Summer Bajra, Groundnut Maturity: Harvest Timing and Care Tips

Web Summary : Summer bajra needs watering during grain filling stage. Harvest when grains separate easily. Groundnut harvest is indicated by yellowing leaves and hardened shells. Proper drying is crucial for storage.