lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > सातपुड्याच्या पायथ्याशी बहरला उन्हाळी भुईमुग, तब्बल 125 हेक्टरवर लागवड 

सातपुड्याच्या पायथ्याशी बहरला उन्हाळी भुईमुग, तब्बल 125 हेक्टरवर लागवड 

Latest News Summer groundnut cultivation on 125 hectares at the foothills of Satpuda | सातपुड्याच्या पायथ्याशी बहरला उन्हाळी भुईमुग, तब्बल 125 हेक्टरवर लागवड 

सातपुड्याच्या पायथ्याशी बहरला उन्हाळी भुईमुग, तब्बल 125 हेक्टरवर लागवड 

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड महसूल मंडळांतर्गत 125 हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड महसूल मंडळांतर्गत 125 हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सिंचन क्षेत्रात वारी वरखेड, सौंदळा, कारला, पिंपरखेड या गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. जिल्ह्यातील हिवरखेड महसूल मंडळांतर्गत १२५ हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हे भुईमुगाचे पीक भुईमुगाचे  चांगलेच बहरले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

महाराष्ट्रात तेलबियांची आठहुन अधिक पिके घेतली जातात. त्यामध्ये भुईमूग हे महत्वाचे पीक म्ह्णून ओळखले जाते. रब्बी हंगामातील तेल वाण असलेल्या भुईमुगाची फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड केली जाते. वारी वारखेड या भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतात. या पिकासाठी शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासून शेतीची मशागत सुरू करावी लागते. मार्चच्या मध्यात पिकाची लागवड करावी लागते. वन्य प्राण्यांकडून धोका असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये राहून पिकाचे रक्षण करावे लागते. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी एकरी ३० ते ३५ पस्तीस हजार रुपये खर्च लागत असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या या भागात भुईमुगाचे पीक चांगलेच बहरले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

शेतकरी अनंता सित्रे म्हणाले की, भुईमुगाची लागवड केल्यानंतर त्याची मोठी निगा घ्यावी लागते. वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस शेतात पहारा द्यावा लागतो. या पिकाला एकरी साधारणपणे ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. तर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी डी. एस. नागे म्हणाले की हिवरखेड महसूल मंडळात दरवर्षी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली जाते. यावर्षी १२५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. 

काढणी, उत्पादन आणि साठवण

भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगांची - टरफल टणक बनुन आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात व पोत्यात भरून ठेवाव्यात. शेंगातील आद्रतेचे प्रमाण १० टक्के पर्यंत खाली आणावे. शेंगा बियाण्यासाठी वापरावयाच्या असल्यास सावलीत चांगल्या वाळवाव्यात अन्यथा बियाण्याची - उगवणक्षमता कमी होते. सुधारित पद्धतीने लागवड केल्यास उन्हाळी भुईमूगापासून सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल वाळलेल्या शेंगाचे उत्पादन मिळते. तसेच पाच ते सहा टन ओला चारा हि मिळतो.
- कृषी विज्ञान केंद्र मोहोळ

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest News Summer groundnut cultivation on 125 hectares at the foothills of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.