Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

latest news Soybean Crop Protection : Important for farmers: Learn about soybean stem borer and cyclone control measures | Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून घ्या. (Soybean Crop Protection)

Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून घ्या. (Soybean Crop Protection)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Crop Protection : सोयाबीनपीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून घ्या. (Soybean Crop Protection)

सोयाबीनपीक हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. मात्र, पीक पिकत असताना अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे उत्पादनावर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. (Soybean Crop Protection)

यात खोडमाशी आणि चक्रीभुंगा या दोन प्रमुख किडींचा समावेश होतो. या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते. (Soybean Crop Protection)

खोडमाशी व्यवस्थापन

खोडमाशी ही किड झाडाच्या खोडाला आतून पोखरून टाकते. त्यामुळे झाडाची ताकद कमी होते आणि उत्पादन घटते.

नियंत्रणासाठी शिफारस 

५ टक्के निम्बोळी अर्काची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

१० ते १५ टक्के झाडांवर प्रादुर्भाव दिसल्यास कीटकनाशक फवारणी करावी.

प्रमुख कीटकनाशके आणि प्रमाण (१० लिटर पाण्यासाठी) 

कीटकनाशकाचे नावप्रमाण
क्लोरअँट्रानिलिप्रोल १८.५% एससी३ मिली
ईथिऑन ५०% ईसी३० मिली
लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.९% सीएस६ मिली
थायोमिथोक्साम १२.६% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी२.५ मिली
क्लोरअँट्रानिलिप्रोल ९.३% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.६% झेडसी४ मिली

चक्रीभुंगा व्यवस्थापन

चक्रीभुंगा ही किड पानांवर गोलाकार खाण करून हिरवळ नष्ट करते. त्यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते.

नियंत्रणासाठी शिफारस

५ टक्के निम्बोळी अर्काची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

३ ते ५ झाडांवर प्रादुर्भाव दिसल्यास कीटकनाशक फवारणी करावी.

प्रमुख कीटकनाशके आणि प्रमाण (१० लिटर पाण्यासाठी)

कीटकनाशकाचे नावप्रमाण
प्रोफेनोफॉस२० मिली
ईथिऑन ५०% ईसी३० मिली
क्लोरअँट्रानिलिप्रोल १८.५% एससी३ मिली
टेट्रानिलिप्रोल १८.५% एससी५ मिली
इमामेक्टिन बेंझोएट ५% एससी८.५ मिली
बीटा-सायफ्लुथ्रिन २.४% + इमिडाक्लोप्रिड १९.८% ओडी७ मिली
ऑस्टीनप्राईड ९% + बायफेंथ्रीन २५% डब्ल्यूजी४ ग्रॅम
थायमिथोक्साम १२.६% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ९.५% झेडसी२.५ मिली
क्लोरअँट्रानिलिप्रोल ९.३% + लँब्डा सायहॅलोथ्रिन ४.६% झेडसी४ मिली

महत्त्वाच्या टिप्स

* सर्व फवारणी करताना शेतमाल सुरक्षिततेचे नियम पाळावेत.

* हातमोजे, चष्मा व मास्क वापरावा.

* कीटकनाशकाच्या शिफारस केलेल्या प्रमाणातच वापर करावा.

* एका हंगामात एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळावा.

(सौजन्य : पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Crop Protection : Important for farmers: Learn about soybean stem borer and cyclone control measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.