Lokmat Agro >स्मार्ट शेती > Top 5 Solar System : सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Top 5 Solar System : सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Solar Scheme Top 5 Solar System These five solar devices best option for farmers, know in detail | Top 5 Solar System : सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Top 5 Solar System : सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Top 5 Solar System : सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे (Solar System) केवळ विजेची बचत करत नाहीत तर पूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम आहेत.

Top 5 Solar System : सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे (Solar System) केवळ विजेची बचत करत नाहीत तर पूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Top 5  Solar System : सौरऊर्जेवर चालणारी (Solar System) उपकरणे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि उपयुक्त आहेत. यामध्ये सोलर ट्रॉली (पोर्टेबल पॉवर सोल्युशन), सोलर रूफटॉप (30-50% वीज बचत), सोलर इन्व्हर्टर, सोलर वॉटर पंप (सिंचनासाठी आधुनिक पंप), आणि सोलर फेन्सिंग सिस्टम (पीक संरक्षण) यांचा समावेश आहे. ही उपकरणे शेतीला सोपी आणि फायदेशीर बनवतात.

सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. ही उपकरणे केवळ विजेची (Power Supply) बचत करत नाहीत तर पूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम आहेत. यासोबतच ही उपकरणे भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने शेतकरी त्यांच्या शेताशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय शोधू शकतात.

1. सोलर ट्रॉली
सोलर ट्रॉली ही एक पोर्टेबल प्रणाली आहे, ज्यामध्ये ट्रॉलीवर सौर पॅनेल बसवले जातात. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज नेले जाऊ शकते. ही ट्रॉली उन्हात उभी करून शेतकरी वीजनिर्मिती करू शकतात, ही ट्रॉली सिंचन व इतर शेतीशी संबंधित कामांसाठी उपयुक्त आहे. वीज नसतानाही हे उपकरण चांगला उपाय देते.

2. सोलर रूफटॉप
सोलर रूफटॉप हे एक उपकरण आहे, जे घराच्या किंवा गोदामाच्या छतावर इन्स्टॉल केले जाते. यामुळे विजेचा खर्च 30 ते 50 टक्के कमी होतो. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर ते 25 वर्षांपर्यंत वीज निर्माण करते. अनेक शेतकरी आज रूफ टॉप सोलर बसविण्याला प्राधान्य देत आहेत. 

3. सोलर इन्व्हर्टर
सौर इन्व्हर्टर सूर्याच्या किरणांनी बॅटरी चार्ज करतो आणि घर किंवा शेताला वीज पुरवतो. विजेची कमतरता असलेल्या भागात हा एक चांगला पर्याय आहे. शेतकरी त्याचा उपयोग शेती उपकरणे जसे पंप, मोटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक मशीन चालविण्यासाठी करू शकतात.

4. सोलर वॉटर पंप
सोलर वॉटर पंप अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही पंपिंग यंत्रणा पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि सिंचनासाठी अतिशय उपयुक्त आहे. या सोलर पॅनलवर चालणाऱ्या पंपामुळे विजेचा वापर कमी होतो आणि शेतकऱ्यांच्या पाणी व्यवस्थापनाच्या समस्या सुटतात.

5. सौर कुंपण यंत्रणा
शेताच्या भोवती सौर कुंपण यंत्रणा बसवली आहे. यामुळे तारांमध्ये विद्युतप्रवाह निर्माण होतो, जो वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरतो. ही प्रणाली पीक संरक्षण तसेच शेतीची इतर कामे सुलभ करते.

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर योजनेत पेमेंट केले तर सोलर मिळतोच का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News Solar Scheme Top 5 Solar System These five solar devices best option for farmers, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.