Salt for Crops : पिकात मिठाचा वापर तणनाशक म्हणून किंवा दुष्काळात आर्द्रता टिकवण्यासाठी केला जातो, पण याचे दुष्परिणामही आहेत; मिठाचा वापर काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, ते पाहुयात...
- मीठ (सोडीयम क्लोराईड ) हे एक पीक अन्नद्रव्य म्हणून वापरू शकतो.
- परंतु मीठ (सोडीयम Na) हे वनस्पती आवक्षक अन्नद्रव्य (Essential Nutrient ) नाही तर मिठ (Nacl) हे functional / Beneficial अन्नद्रव्य आहे.
- त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात (0.058 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून) पोटॅशियम कमी असलेल्या जमिनीत मिठाचा वापर काही ठरविक पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापनात करता येतो.
- अशा जमिनीत सोडीयम (Na) काही प्रमाणात पोटॅशियमची कार्य पारपाडतो.
कोणत्या पिकात मिठाचा वापर करता येतो?
क्षार प्रिय किंवा क्षार सहनशील पीके : शुगर बिट गाजर, नारळ, कोको, ऑलीव्ह, निलगिरी, शतावरी, ब्रोकोली, पालक तसेच ज्वारी, बाजरी व इतर मिलेट या पिकात कार्बनडायओक्सईड चे शोषण व पायरुव्हेट वहाना करीत सोडीयम ची गरज असते.
- डॉ. अरुण भाऊराव कांबळे, माजी प्राध्यापक, कृषी विद्या, कृषी महाविद्यालय, पुणे
