Lokmat Agro >स्मार्ट शेती > Vihir Satbara Nond : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर अन् बोअरवेलची नोंद घरबसल्या करा, अशी आहे प्रक्रिया 

Vihir Satbara Nond : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर अन् बोअरवेलची नोंद घरबसल्या करा, अशी आहे प्रक्रिया 

Latest News Register your well and borewell on Satbara from home, see sipmle process | Vihir Satbara Nond : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर अन् बोअरवेलची नोंद घरबसल्या करा, अशी आहे प्रक्रिया 

Vihir Satbara Nond : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर अन् बोअरवेलची नोंद घरबसल्या करा, अशी आहे प्रक्रिया 

Vihir Satbara Nond : अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतील विहीर किंवा बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर (Satbara) करायची असते.

Vihir Satbara Nond : अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतील विहीर किंवा बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर (Satbara) करायची असते.

शेअर :

Join us
Join usNext

Vihir Satbara Nond : महाराष्ट्रात विहीर किंवा बोअरवेलची नोंद (Well or borewell record) करण्यासाठी, ई-पीक पाहणी ॲप किंवा dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन ( अर्ज करता येतो.  या ॲपमधून शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांची नोंद करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होणार आहेत.

अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतील विहीर किंवा बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करायची असते. मात्र नोंद नेमकी कुठे करायची, हेच कळत नाही. मात्र आता शेतकऱ्यांना घरबसल्या नोंद करता येणार आहे. ई पीक पाहणीच्या (E Pik Pahni DCS 2.0) माध्यमातून ही नोंद केली जात आहे.

ना लेखी अर्ज, ना शुक्ल ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी आपल्या शेतातूनच बोअरवेल, विहीर, झाडे यांची नोंद करू शकणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कोणताही लेखी अर्ज, तसेच शुक्ल भरण्याची गरज नाही. अगदी मोफत आणि विशेष म्हणजे शेतातूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. 

अशी आहे सोपी प्रक्रिया 

  • सर्वप्रथम ई पीक पाहणी हे ॲप आपल्या मोबाईलद्वारे डाऊनलोड करा. 
  • अँप इन्स्टॉल झाल्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचा आहे. 
  • खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ‘कायमपड/ चालू पड असा पर्याय येईल. 
  • यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे. 
  • कायम आणि चालू पड प्रकार निवडा. 
  • यानंतर अनेक पर्याय दिसून येतील, यातील हवा असलेला पर्याय निवडा. 
  • बोअरवेल करिता कूपनलिका पड हा पर्याय निवडा. 
  • संबंधित बोअरवेल किंवा विहिरीचे फोटो अपलोड करायचे आहेत. 
  • ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या माहिती बाबत व इतर नोंदीबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार आहे. त्यावर क्लिक करून सबमिट करा. 

 

Kanda Chal : कांदा अधिक काळ टिकवण्यासाठी अशी करा चाळ दुरुस्ती, 'हे' साहित्य वापरा

Web Title: Latest News Register your well and borewell on Satbara from home, see sipmle process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.