Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

Latest news Read in detail what measures should be taken to produce the desired bunches in grape farming | द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

द्राक्ष बागेत अपेक्षित घड निर्मितीसाठी काय-काय उपाययोजना कराव्यात, वाचा सविस्तर 

Draksh Farming : दोन्ही पद्धतींमध्ये छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर वेलीवर वेगवेगळे ताण दिले जातात.

Draksh Farming : दोन्ही पद्धतींमध्ये छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर वेलीवर वेगवेगळे ताण दिले जातात.

Draksh Farming :    सर्वत्र थॉम्पसन सीडलेस आणि शरद सीडलेस यांचे विविध क्लोन्स प्रचलित आहेत. या सर्व वाणांमध्ये खरड छाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांनी त्यावेळी वाढत असलेल्या डोळ्यांमध्ये सुप्त अवस्थेमध्ये घडांची निर्मिती होते. काही बागेत शेंडा पिंच करून सबकेन करतात, तर काही ठिकाणी सरळ केन ठेवतात. दोन्ही पद्धतींमध्ये छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर वेलीवर वेगवेगळे ताण दिले जातात. काही वाढ थांबवणाऱ्या रसायनांचा वापर केला जातो. 

फवारणीद्वारे सायटोकायनिन किंवा पांढऱ्या मुळ्ळ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. याच वेळी वेलींना पाण्याचा हलका ताण दिला जातो. या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणून डोळ्यांमध्ये घडनिर्मिती होते. या सर्व गोष्टींमध्ये जास्त महत्त्वाचा आहे, तो वेलींवरील पाण्याचा ताण. पाण्याचा ताण अपेक्षेप्रमाणे नसल्यास घड निर्मिती अपेक्षेप्रमाणे होत नाही.

खरे पाहता ४५ ते ६५ दिवसांत पाऊस झाल्यास जमीन ओली होते आणि पाण्याचा ताण देणे आपल्या हातात राहत नाही. विशेषतः काळ्या भारी जमिनीत हलक्या पावसानेसुद्धा जमीन बऱ्यापैकी ओली होऊन ओल काही दिवस टिकून राहते. मागच्या वर्षी ज्या बागांमध्ये छाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांत पाण्याचा ताण देता आला नाही, तिथे घडनिर्मिती अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 

घडनिर्मितीसाठी व त्यानंतर घड चांगला होण्यासाठी काड्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. पावसाळी वातावरणात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे घडनिर्मितीवर परिणाम होतो. म्हणून खरड छाटणी करत असताना छाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांनी पावसाची शक्यता आहे किंवा नाही, याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे.

Web Title : अंगूर के बाग का प्रबंधन: इष्टतम कली निर्माण के लिए मुख्य रणनीतियाँ

Web Summary : अंगूर की इष्टतम कली निर्माण छंटाई के बाद नियंत्रित जल तनाव पर निर्भर करता है। महत्वपूर्ण अवधि के दौरान अपर्याप्त धूप और बारिश कली के विकास में बाधा डालती है। संभावित वर्षा पर विचार करते हुए उचित छंटाई सफलता के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Grape Orchard Management: Key Strategies for Optimal Bud Formation

Web Summary : Optimal grape bud formation hinges on controlled water stress post-pruning. Insufficient sunlight and rain during critical periods hinder bud development. Proper pruning, considering potential rainfall, is crucial for success.