Agriculture News : वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी पाणी व्यवस्थापन करताना, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि उपलब्ध जलस्रोतांनुसार (पाऊस, विहीर, कालवा) नियोजन करणे आवश्यक असते. सध्या थंडीचे दिवस असल्याने या काळात पाणी व्यवस्थापन कसे ठेवावे, हे समजून घेऊयात...
वेलवर्गीय भाजीपाला पिके - पाणी व्यवस्थापन
वेलवर्गीय भाजीपाला पिके जरी पाण्याचा ताण सहन करु शकत असली तरी किफायतशीर उत्पादन मिळविण्याकरिता वेलवर्गीय भाजीपाला पिकांना पाण्याचे व्यवस्थापन करताना वातावरणातील तापमान, जमिनीचा मगदूर आणि पिकाची अवस्था यानुसार पाणी द्यावे.
शक्यतो सहा ते आठ दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. शक्य असल्यास ठिबक सिंचन पध्दतीने पिकाला पाणी द्यावे. प्रती दिवस १ तास संच चालू ठेवावा. पिकाची वाढीची अवस्था, फुलधारणा, फळधारणा या संवेदनशील अवस्थेत कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. अन्यथा वाढीवर, फळ पोसण्यावर परिणाम होतो आणि उत्पादनामध्ये घट येते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
