Rabbi Maka Perani : रब्बी हंगामातीलमकापेरणीसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करणे आवश्यक असते. रब्बी हंगामातीलमका लागवड खरीप हंगामापेक्षा अधिक फायदेशीर असू शकते आणि त्यासाठी योग्य नियोजन, जसे की खत व्यवस्थापन आणि योग्य वाणांची निवड, करणे आवश्यक असते.
रब्बी मका पिकाची पेरणी
- पाण्याची उपलब्धता असल्यावरच रब्बी मका पिकाची पेरणी करावी.
- रब्बी हंगामात मका पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी.
- पेरणीसाठी एकरी ६ ते ८ किलो बियाणे लागते.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम आणि सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८%) + थायमिथोक्झाम (१९.८% एफएस) हे संयुक्त कीटकनाशक ६ मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक बीजप्रकियेनंतर, अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रब्बी हंगामात सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.
- उशिरा व मध्यम कालावधीच्या जातींसाठी ७५ x २० सें.मी. तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें. मी. अंतरावर सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
