Lokmat Agro >स्मार्ट शेती > वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अपेक्षित फळधारणेतील समस्या व उपाय, वाचा सविस्तर 

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अपेक्षित फळधारणेतील समस्या व उपाय, वाचा सविस्तर 

Latest News Problems and solutions in expected fruit set in vegetable crops, read in detail | वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अपेक्षित फळधारणेतील समस्या व उपाय, वाचा सविस्तर 

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अपेक्षित फळधारणेतील समस्या व उपाय, वाचा सविस्तर 

Vegetable Farming : अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती, फळधारणा कमी होते.

Vegetable Farming : अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती, फळधारणा कमी होते.

शेअर :

Join us
Join usNext

Vegetable Farming :  वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये (Bhajipala Pike) फुलांची निर्मिती आणि अपेक्षित फळधारणेमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी प्रतिकूल वातावरण, लागवडीची अयोग्य वेळ व जातीची निवड, असंतुलित खतमात्रा, अयोग्य सिंचन व्यवस्थापन, परागीभवनातील समस्या, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अतिरिक्त शाकीय वाढ इत्यादी कारणे आहेत.

व्यवस्थापन कसे करायचे ?
वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीचा योग्य हंगाम साधावा व कालावधीनुसार योग्य जातीची निवड करावी. अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती, फळधारणा कमी होते.

म्हणून माती परीक्षणानुसार पिकास मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य अवस्थेला संतुलित मात्रेत वापर करावा. पिकवाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेप्रमाणे सिंचन करावे. जमीन कायम वाफसा स्थितीत राहील तसेच शेतात अतिरिक्त पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

प्राधान्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. परपरागीभवनासाठी मधमाशा, उपयुक्त कीटक मदत करतात. त्यामुळे भाजीपाला लागवड क्षेत्रात किंवा सभोवती मधमाशीपालन किंवा मधमाशांचे संवर्धन करावे, पीक फुलधारणा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा. 

ते शक्य नसल्यास मधमाशा किंवा मित्रकीटक यांना हानिकारक असणारी कीडनाशके वापरण्याचे टाळावे किंवा जैविक कीडनाशके वापरावीत. फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी, जेणेकरून नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत मिळेल.

लक्षणे व प्रादुर्भावाची पातळी यानुसार वेळीच कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच फुलगळ, फळगळ रोखण्यासाठी शिफारशीत संजीवकांचा योग्य त्या मात्रेमध्ये वापर करावा.

Web Title: Latest News Problems and solutions in expected fruit set in vegetable crops, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.