Lokmat Agro >स्मार्ट शेती > PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

Latest news PM Kusum Yojana Last chance for farmers to pay PM Kusum Yojana fees see details | PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

PM Kusum Solar :  अशा शेतकऱ्यांना मेडाकडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात येत आहेत.

PM Kusum Solar :  अशा शेतकऱ्यांना मेडाकडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kusum Solar : पीएम कुसुम सोलर (PM Kusum Solar) योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज महा ऊर्जा कडे होते. म्हणजे त्यांचे अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते. अशा अर्जासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. पीएम कुसुम घटक योजनेअंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळाली होती, परंतु अशा अर्जांचे अजूनही पेमेंट (Pm Kusum Solar Payment) झालेले आहे, अशा अर्जांना आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे.

सात दिवसात जर या शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत तर त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत आता एक अपडेट समोर आले आहे. तर अशा शेतकऱ्यांना मेडा कडून मोबाईल नंबरवर मेसेज पाठवण्यात आला आहे. 

यामध्ये लिहिले आहे की, 'प्रिय पुढे लाभार्थ्याचे नाव कुसुम योजना अंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास यापूर्वी वारंवार करूनही आपणाकडून लाभार्थीचा अप्राप्त आहे लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी आपणास अंतिम सात दिवसांची मुदत देण्यात येत आहे आपण मुदतीमध्ये लाभार्थी हिस्सा न भरल्यास आपला लाभार्थीचा भरण्याचा पर्याय बंद करून, आपला अर्ज अपूर्ण आहे, असे समजून पुढील लाभार्थ्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल,' असे मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे. 

जर तुम्हाला शुल्क भरणा करायचा असेल तर....

  • सुरुवातीला प्लेस्टोर वर जाऊन मेडा बेनिफिशियरी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे. 
  • यानंतर हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर आपण मेडाकडे दिलेल्या मोबाईल नंबरच्या साह्याने लॉगिन करायचे आहे. 
  • यानंतर अर्ज तपशील या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यात लाभार्थ्यांचा तपशील दिसून येईल. 
  • यातच शेवटी देय म्हणजे भरणा करायची रक्कम दाखवली जाईल. 
  • यानंतर स्वयं सर्वेक्षण असे असा पर्याय दाखवला जाईल. 
  • त्या शेतकऱ्यांना असा पर्याय दाखवला जाईल, त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत पुढील प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 
  • जर ही प्रक्रिया तुम्ही सात दिवसाच्या आत केली नाही तर तुमचा अर्ज बाद केला जाण्याची शक्यता आहे आणि या योजनेतून तुम्हाला वगळण्यात येईल.

Web Title: Latest news PM Kusum Yojana Last chance for farmers to pay PM Kusum Yojana fees see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.