Lokmat Agro >स्मार्ट शेती > PM Jivan Jyoti : वर्षाला 436 रुपये हफ्ता भरा, दोन लाख रुपयांचा विमा मिळवा, काय आहे 'ही' योजना? 

PM Jivan Jyoti : वर्षाला 436 रुपये हफ्ता भरा, दोन लाख रुपयांचा विमा मिळवा, काय आहे 'ही' योजना? 

Latest News PM jivan Jyoti Scheme Pay Rs 436 per year, get insurance worth Rs 2 lakh | PM Jivan Jyoti : वर्षाला 436 रुपये हफ्ता भरा, दोन लाख रुपयांचा विमा मिळवा, काय आहे 'ही' योजना? 

PM Jivan Jyoti : वर्षाला 436 रुपये हफ्ता भरा, दोन लाख रुपयांचा विमा मिळवा, काय आहे 'ही' योजना? 

PM Jivan Jyoti : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PM Jivan Jyoti Scheme) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक मुदत विमा योजना आहे.

PM Jivan Jyoti : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PM Jivan Jyoti Scheme) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक मुदत विमा योजना आहे.

शेअर :

Join us
Join usNext

धुळे : प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेच्या(PM Jivan Jyoti Yojana) खातेदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर वारसाच्या खात्यावर दोन लाखांची (Vima Scheme) रक्कम जमा होते. यासाठीचा वर्षाला ४३६ रुपयांचा हप्ता असून १७ ते ३० मेदरम्यान किंवा ५ जूनपर्यंत ही रक्कम खात्यातून कापली जाणार आहे, अशी माहिती धुळे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक रूपेश शर्मा यांनी दिली आहे.

पीएम जीवन ज्योती विमा योजना काय आहे?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक मुदत विमा योजना आहे. ही योजना १८ ते ५० वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. खातेदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील नामनिर्दिष्ट व्यक्तीला दोन लाख रुपयांचा विमालाभ दिला आतो. यासाठी वर्षाला ४३६ रुपयांचा हप्ता असतो. 

कोठे अर्ज कराल?
ही योजना बँक खात्याशी संलग्न असल्यामुळे, नागरिकांनी त्यांच्या जवळच्या बैंकत जाऊन अर्ज करावा लागतो. बहुतांश राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. दोन्ही ठिकाणी सारखा लाभदेण्यात येत असल्याचे सांगितले.

वारसाला मिळतात दोन लाख रुपये 
खातेदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील नामनिर्दिष्ट व्यक्तीला दोन लाख रुपयांचा विमा लाभ दिला जातो. अपधातांमध्ये मृत्यू झाल्यानंतर संबंधितांच्या परिवाराला आर्थिक मदतीच्या अनुषंगाने सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना' सुरू केली आहे. 

४३६ रुपयांत दोन लाखांचा विमा 
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत माफक दर आहे. वर्षभरासाठी केवळ ४३६ रुपयांचा प्रीमियम भरला की, दोन लाख रुपयांची विमा सुरक्षा मिळते. कोणत्याही सामान्य बँक खातेदाराला ही योजना घेता येते. जर हप्ता वेळेवर वळता झाला नाही, तर विमा योजनेचे पुढील वर्षासाठी नूतनीकरण होणार नाही आणि विमालाभ मिळणार नाही.

Web Title: Latest News PM jivan Jyoti Scheme Pay Rs 436 per year, get insurance worth Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.