Lokmat Agro >स्मार्ट शेती > भात पिकावर खोड किड, पोंग्यातील माशी व तुडतुडे या किडींचे नियंत्रण कसे कराल? 

भात पिकावर खोड किड, पोंग्यातील माशी व तुडतुडे या किडींचे नियंत्रण कसे कराल? 

Latest news Paddy crop Management How to control pests stem borer, hopper fly and locusts in rice crop | भात पिकावर खोड किड, पोंग्यातील माशी व तुडतुडे या किडींचे नियंत्रण कसे कराल? 

भात पिकावर खोड किड, पोंग्यातील माशी व तुडतुडे या किडींचे नियंत्रण कसे कराल? 

Paddy crop Management :

Paddy crop Management :

शेअर :

Join us
Join usNext

Paddy crop Management :    भात पिकावर खोड किड, पोंग्यातील माशी व तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी कार्बोफुरान ३ टक्के दाणेदार २५ कि. ग्रॅ. प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार १६.७ कि. ग्रॅ. प्रति हेक्टर यापैकी एक दाणेदार कीटकनाशक द्यावे. 

  • खोड किड, पाने गुंडाळणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी कारट्याप हायड्रोक्लोराईड ४ टक्के दाणेदार कीटकनाशक २१.८ कि. ग्रॅ. प्रति हेक्टर किंवा क्लोरानट्रानिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार कीटकनाशक १० किलो प्रति हेक्टर यापैकी एक कीटकनाशक द्यावे, अथवा.. 
  • बायफेन्थ्रीन १० ई. सी. १० मिली किंवा अझाडीरकटीन ०.१५% ई. सी. ३० मिली किंवा कार्बोसल्‌फान २५ ई. सी. १६ मिली किंवा कारट्याप हायड्रोक्लोराईड ५० टक्के विद्राव्य भुकटी २० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी यापैकी एका कीटक नाशकाची फवारणी करावी.

 

रोग नियंत्रण

  • भात पिकावर पर्णकोश करपा, कडा करपा (जिवाणूजन्य करपा), बुरशीजन्य करपा व पानांवरील ठिपके या रोगांच्या नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोल ४% झायनेब ६८% विद्राव्य भुकटी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी
  • पर्णकोश करपा व बुरशीजन्य करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी टेबुकोनॅझोल ५०% + ट्रीफ्लॉकसोस्ट्रॉबीन २५% विद्राव्य दाणेदार बुरशीनाशक ४ ग्रॅम/१० लिटर पाणी
  • बुरशीजन्य करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी कारबेनडेझीम 12% + मन्कोझेब ६३ % डब्लू पी. १५ ग्रॅ. प्रती १० लिटर पाणी या मिश्र बुरशी नाशकाची गरजेनुसार फवारणी करावी व
  • कडा करपा (जिवाणूजन्य करपा) या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर हैड्रॉकसाईड ५३.८% विद्राव्य भुकटी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या बुरशी नाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.

 

- कृषी संशोधन केंद्र, पालघर व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Web Title: Latest news Paddy crop Management How to control pests stem borer, hopper fly and locusts in rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.