Lokmat Agro >स्मार्ट शेती >  मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येईल 

 मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येईल 

Latest news Mini tractor scheme Government subsidy up to 90 percent for mini tractors, read in details |  मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येईल 

 मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येईल 

Mini Tractor Scheme : जर तुम्हालाही मिनी ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्यास अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mini Tractor Scheme : जर तुम्हालाही मिनी ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्यास अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक बचत गटांनी 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे.

या याजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी  रूपये 3 लाख 50 हजार मर्यादेत 90 टक्के (कमाल रूपये 3 लाख 15 हजार) शासकीय अनुदान अनुज्ञेय आहे. 

योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटांचे अध्यक्ष, सचिव व 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. 

इतर अटी व शर्ती तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी-विंग, दुसरा मजला, नासर्डी पुलाजवळ नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Latest news Mini tractor scheme Government subsidy up to 90 percent for mini tractors, read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.