Amba Mohor : आंबा मोहराचे परागीभवन मुख्यत्वे कीटक आणि वाऱ्यामुळे होते, ज्यात मधमाश्या व इतर कीटक परागकण नर फुलांपासून मादी फुलांपर्यंत पोहोचवतात, पण अति थंडी व मावा-तुडतुडे यांसारख्या किडींमुळे हे परागीभवन नीट होत नाही, ज्यामुळे फळधारणा कमी होते. या काळात आंबा मोहोराची विशेष काळजी घ्यावी लागते.
आंबा मोहोर नियोजन
- आंबा मोहोरामध्ये नर व संयुक्त फुले ओळखणे आवश्यक आहे.
- अति थंडीमुळे नर फुलांचे प्रमाण वाढून संयुक्त फुलांचे प्रमाण अतिशय कमी होते.
- तसेच थंडीमुळे परागीभवन करणारे कीटक कमी प्रमाणात आढळतात.
- यामुळे परागीभवन न होता आंबा मोहोर वाळताना दिसतो.
- आंबा मोहोरातील परागीभवन वाढविण्यासाठी हाताजवळील मोहोरावरून हात फिरवावा, उंच फांदीवरील मोहोरासाठी बांबूच्या काठीला केरसुणी बांधून फिरवावी.
- आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा.
- यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी.
- माशाला पक्षांपासून वाचविण्यासाठी रिकाम्या बाटलीचा तळ काढून बुचातून तार घालून आत माशाचा काही भागात लटकत ठेवावा.
- या लटकवलेल्या माशाचा वास पसरावा, म्हणून बाटलीला झरोके निर्माण करावेत.
- यामुळे परागीभवन करणारे कीटक विशेष करून माशा आकर्षित होऊन आंब्यामध्ये परागीभवन होताना आढळते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
