Lokmat Agro >स्मार्ट शेती > मका आणि बाजरीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल अन् कशी? वाचा सविस्तर 

मका आणि बाजरीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल अन् कशी? वाचा सविस्तर 

Latest news Maka Bajari perni Till what date can maize and millet be sown and how Read in detail | मका आणि बाजरीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल अन् कशी? वाचा सविस्तर 

मका आणि बाजरीची पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल अन् कशी? वाचा सविस्तर 

Agriculture News : मका आणि बाजरीची पेरणी (Maka Perani) देखील सुरु असून या पिकांच्या पेरण्या किती तारखेपर्यंत करू शकतो? हे पाहुयात.... 

Agriculture News : मका आणि बाजरीची पेरणी (Maka Perani) देखील सुरु असून या पिकांच्या पेरण्या किती तारखेपर्यंत करू शकतो? हे पाहुयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : खरीप हंगामातील (Kharif Season) पेरण्यांनी वेग घेतला असून काही पिकांच्या पेरण्या (Bajari Perani) अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मका आणि बाजरीची पेरणी (Maka Perani) देखील सुरु असून या पिकांच्या पेरण्या किती तारखेपर्यंत आणि कशी करू शकतो? हे पाहुयात.... 

मकापेरणीबाबत.... 
जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पाऊस व पावसाचा अंदाज लक्षात घेता खरीप हंगामात मक्याची पेरणी १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी.

  • खरीप हंगामात पेरणी सपाट वाफ्यांमध्ये करावी. 
  • पेरणीचे अंतर उशिरा व मध्यम कालावधी असणाऱ्या जातींसाठी ७५ × २० सें.मी तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें. मी ठेवावे. 
  • पेरणी टोकण पद्धतीने ४ ते ५ सें. मी खोलीवर करावी.
  • अॅट्राटॉप ५० टक्के हेक्टरी २.५ किलो पेरणी संपताच जमिनीवर फवारावे. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
  • मका पिकाची पेरणी टोकन पद्धतीने करावी. 
  • त्याकरिता बियाणे प्रमाण १५-२० किलो प्रती हेक्टरी वापरावे.


बाजरी पीक पेरणीबाबत... 
समाधानकारक पाऊस व पावसाचा अंदाज लक्षात घेता शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देऊन तसेच जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पिकाच्या अंतरानुसार खरीप हंगामात बाजरीची १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी.

  • खरीप हंगामात पेरणी सरी-वरंबा (थेंब थेंब संचय पद्धत) किंवा सपाट वाफे पद्धतीने करावी. 
  • पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. 
  • पेरणीचे अंतर कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीत ४५ सें.मी आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे. 
  • नियमित पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे ३० x १५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी. 
  • त्याकरिता बियाणे प्रमाण ३-४ किलो प्रती हेक्टरी वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. 


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest news Maka Bajari perni Till what date can maize and millet be sown and how Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.